मोदींचे गुजरातमधले फेव्हरेट अधिकारी आता 'मिशन काश्मीर'वर

मोदींचे गुजरातमधले फेव्हरेट अधिकारी आता 'मिशन काश्मीर'वर

काश्मीरमधलं कलम 370 रद्द करण्याबरोबरच काश्मीरचं विभाजन करण्यात आलं होतं. काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले. आता दोन्हीकडे लेफ्टनंट गव्हर्नरची नेमणूक झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : मोदी सरकारने काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर आता काश्मीरबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. IAS अधिकारी गिरीश चंद्र मुरमु यांची जम्मू-काश्मीरचे पहिले लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नेमणूक झालीय. याबरोबरच राधाकृष्ण माथुर लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर झाले आहेत.

काश्मीरमधलं कलम 370 रद्द करण्याबरोबरच काश्मीरचं विभाजन करण्यात आलं होतं. काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले. आता दोन्हीकडे लेफ्टनंट गव्हर्नरची नेमणूक झाली आहे. याआधी जम्मू काश्मीरचे राज्यपाल असलेले सत्यपाल मलिक यांची गोव्याचे गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली.

गुजरातमधले अधिकारी

गिरीशचंद्र मुरमु हे 1985 च्या बॅचचे गुजरात केडरचे अधिकारी आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते मुख्य सचिव होते. जम्मू- काश्मीर आणि लडाख हे 31 ऑक्टोबरपासून केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात येणार आहेत. या लेफ्टनंट गव्हर्नरचा शपथविधीही त्याच दिवशी होणार आहे.

जम्मू -काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर इथल्या कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती आणि पोलीस दलावर लेफ्टनंट गव्हर्नरच्या माध्यमातून केंद्राचं थेट नियंत्रण असेल. त्याचवेळी तिथलं प्रशासन निवडून आलेल्या सरकारच्या अंतर्गत असेल. 31 ऑक्टोबरनंतर काश्मीरमध्ये हा मोठा बदल होणार आहे.

Loading...

=================================================================================

VIDEO : उदयनराजेंना आस्मान दाखवणारे 'पैलवान' पवारांच्या भेटीला, रंगला गप्पांचा फड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2019 09:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...