कोण आहेत अर्शद खान? अमित शहा भेटणार त्यांच्या कुटुंबीयांना

काश्मीरमध्ये 12 जूनला मोटरसायकलवर आलेल्या अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या गस्तीपथकांवर हल्ला चढवला. यामध्ये अर्शद खान यांनाही गोळी लागली. अतिरेक्यांची गोळी लागल्यानंतरही एसएचओ अर्शद खान मोठ्या धीराने लढत राहिले.

News18 Lokmat | Updated On: Jun 26, 2019 05:55 PM IST

कोण आहेत अर्शद खान? अमित शहा भेटणार त्यांच्या कुटुंबीयांना

श्रीनगर, 26 जून : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पहिल्यांदाच काश्मीर दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात अमित शहा अनंतनागलाही जातील. ते एक जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेचा सुरक्षाआढावाही घेणार आहेत.

अमित शहा अनंतनागमधल्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांनाही भेटणार आहेत. दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये 12 जूनला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अर्शद खान हे सुरक्षा अधिकारी जखमी झाले होते.

अतिरेकी हल्ल्यात मृत्यू

त्यांना दिल्लीतल्या एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं पण उपचारादरम्यान 16 जूनला अर्शद खान यांचा मृत्यू ओढवला. याच दहशतवादी हल्ल्यात 6 सुरक्षा कर्मचारी शहीद झाले.

अर्शद खान यांना पहिल्यांदा श्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे एअर अँब्युलन्सने त्यांना दिल्लीला एम्समध्ये आणण्यात आलं. पण तरीही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. अर्शद खान यांच्या छातीत गोळी लागली होती.

Loading...

प्राणांची पर्वा न करता लढले

काश्मीरमध्ये 12 जून ला मोटरसायकलवर आलेल्या अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या गस्तीपथकांवर हल्ला चढवला. यामध्ये सीआरपीएफचे 5 जवान शहीद झाले. यामध्ये अर्शद खान यांनाही गोळी लागली.याचवेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एका अतिरेक्यालाही ठार केलं.

अतिरेक्यांची गोळी लागल्यानंतरही एसएचओ अर्शद खान मोठ्या धीराने लढत राहिले.

बालाकोट एअर स्ट्राइकचे सूत्रधार सामंत गोयल बनले नवे रॉ प्रमुख

आपल्या प्राणांचीही पर्वा न करता त्यांनी अतिरेक्यांना प्रतिकार केला. पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.शहीद अर्शद खान यांच्या चार वर्षाच्या मुलाने तिरंग्यामध्ये लपेटलेल्या आपल्या वडिलांना अखेरची सलामी दिली होती.

कुटुंबीयांशी संवाद

अर्शद खान यांनी बजावलेल्या कामगिरीबदद्ल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. अर्शद खान यांची पत्नी निलोफर, त्यांची मुलं अबुहान खान आणि दनिम खान यांच्यासोबतच अर्शद खान यांचे आईवडील आणि छोट्या भावाशीही अमित शहा संवाद साधतील.

श्रीनगरचे अर्शद खान 2002 मध्ये पोलीस सेवेत दाखल झाले. त्यांना सब इन्स्पेक्टर पदावर काम करत करिअरची सुरुवात केली होती. ते शहीद झाले तेव्हा ते अनंतनागमध्ये स्टेशन हाऊस ऑफिसरची जबाबदारी सांभाळत होते.

======================================================================================================

VIDEO: मॉब लिंचिंगवर पहिल्यांदाच बोलले PM मोदी, संसदेत म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 26, 2019 05:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...