Article 370: अमित शहांनी एकाच दगडात मारले अनेक पक्षी, आता होणार हे बदल

Article 370: अमित शहांनी एकाच दगडात मारले अनेक पक्षी, आता होणार हे बदल

काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द करण्याची शिफारस गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केली. त्यासोबतच जम्मू- काश्मीर आणि लडाख हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला. हा निर्णय घेऊन अमित शहांनी अनेक उद्दिष्टं साध्य केली आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द करण्याची शिफारस गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केली. त्यासोबतच जम्मू- काश्मीर आणि लडाख हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला. हा निर्णय घेऊन अमित शहांनी अनेक उद्दिष्टं साध्य केली आहेत.

भाजपचं वजन वाढलं

काश्मीरमध्ये ज्या 87 जागांवर निवडणुका होतात त्यातल्या 37 जागा जम्मूमध्ये येतात तर 50 जागा काश्मीरमध्ये येतात. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जम्मूमधल्या 37 जागांपैकी 25 जागा मिळवल्या. यामुळे भाजप काश्मीरमध्ये दोन नंबरचा पक्ष बनला. या स्थितीत लडाख केंद्रशासित प्रदेश बनला तर जम्मू काश्मीरच्या राजकारणात भाजपचं वजन वाढेल.

प्रत्यक्षात जम्मू-काश्मीरमध्ये 111 जागा आहेत. त्यातल्या 24 जागा पाकव्याप्त काश्मीरमध्ये येतात. त्यामुळे तिथे निवडणुका होऊ शकत नाहीत. या जागा रिकाम्या मानल्या जातात.

PHOTO : काश्मीरच्या निर्णयाबदद्ल फाडले कपडे तर दुसरीकडे जल्लोष

जम्मू काश्मीर स्टडी सेंटरच्या संचालिका डॉ. आभा यांच्या मते, आता बदललेल्या परिस्थितीत मतदारसंघांची पुनर्रचना होईल. जम्मू भागात लोकसंख्या जास्त असूनही इथे विधानसभेच्या जागा कमी आहेत.

भाजपला होणार फायदा

सरकारने जर मतदारसंघांची पुनर्रचना केली तर मैदानी भागात विधानसभेच्या जागा वाढतील. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे जम्मूच्या मतदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केलं त्यावरून हे स्पष्ट होतं की इथे भाजपचा प्रभाव आणखी वाढू शकतो. याआधीही काँग्रेस आणि भाजपने इथल्या मतदारसंघांची पुनर्रचना करण्याची मागणी केली होती. 1995 मध्ये जी पुनर्रचना झाली त्यानंतर परिस्थिती  बदलली आहे.

PHOTO:कलम 370 हटवल्यानंतर ही आहे काश्मीरमधली सध्याची स्थिती

दोन्ही भागांचे प्रतिनिधी पाहिले तर क्षेत्रफळ आणि लोकसंख्येमध्ये मोठं अंतर आहे. त्यामुळेच पुनर्रचनेची गरज आहे. लडाख वेगळं झाल्यानंतर आणि नव्या पुनर्रचनेनंतर जम्मू क्षेत्रातल्या विधानसभा जागांची संख्या काश्मीरपेक्षा जास्त होईल. याचाही फायदा भाजपलाच होऊ शकतो.

===============================================================================

Article370 रद्द केल्याच्या आनंदात गिरीष महाजन नाचू लागले, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2019 05:00 PM IST

ताज्या बातम्या