काश्मीरमध्ये हायवेलगतच्या घरात लपलेले 6 अतिरेकी ठार, तब्बल 9 तास सुरू होतं ऑपरेशन

काश्मीरमध्ये हायवेलगतच्या घरात लपलेले 6 अतिरेकी ठार, तब्बल 9 तास सुरू होतं ऑपरेशन

लष्कराच्या एका पथकावर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर काश्मीरच्या रामबन भागात मोठी शोधमोहीम राबवण्यात आली. यामध्ये कोंडीत सापडलेल्या अतिरेक्यांना सुरक्षा दलांनी वेढा घातला.

  • Share this:

जम्मू, 28 सप्टेंबर : काश्मीरमध्ये हायवेगलतच्या एका घरात लपून बसलेल्या 6 अतिरेक्यांना सुरक्षादलांनी ठार केलं. या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला तर 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले. या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठीचं ऑपरेशन तब्बल 9 तास चाललं. रामबन जिल्ह्यातल्या एका गावात अतिरेक्यांशी चकमक झाल्यानंतर त्यांनी हायवेलगतच्या एका घरात आसरा घेतला. या अतिरेक्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं. तरीही ही चकमक सुरूच आहे, अशी माहिती लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

अतिरेक्यांना घातला वेढा

लष्कराच्या एका पथकावर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर काश्मीरच्या या भागात मोठी शोधमोहीम राबवण्यात आली. यामध्ये कोंडीत सापडलेल्या अतिरेक्यांना सुरक्षा दलांनी वेढा घातला. हे अतिरेकी किश्तवार भागातून आले असावेत, असा अंदाज आहे. त्यांनी रात्री हायवेवरच्याच एका ठिकाणी आसरा घेतला असावा, असंही सुरक्षा दलांचं म्हणणं आहे.

( हेही वाचा : इम्रान खान यांच्या भाषणाला या भारतीय महिला अधिकाऱ्याने 6 मिनिटांत दिलं उत्तर)

ज्या भागात अतिरेक्यांशी चकमक झाली त्याठिकाणी अडकलेल्या नागरिकांनाही सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं. इथली मुलं आणि महिला सुऱक्षित आहेत, असं सुऱक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. ही चकमक सुरू असेपर्यंत हायवेची वाहतूक रोखून धरण्यात आली होती.

=================================================================================================

....म्हणून अजित पवारांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2019 06:02 PM IST

ताज्या बातम्या