Home /News /national /

Kashmir: 370 कलम हटवल्यानंतर सुरक्षा दलं आक्रमक, 11 महिन्यात 200 दहशतवादी ठार

Kashmir: 370 कलम हटवल्यानंतर सुरक्षा दलं आक्रमक, 11 महिन्यात 200 दहशतवादी ठार

रविवारी सैफुल्ला हा मारला गेला. तो ऑक्टोबर 2014पासून राज्यात दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता. दहशतवाद्यांचा मारला गेलेला पोस्टर बॉय बुऱ्हाण वाणी याच्यासोबतही त्याने काम केलं होतं.

    श्रीनगर 01 नोव्हेंबर: जम्मू आणि काश्मीरमधलं (jammu and Kashmir) वादग्रस्त 370 कलम(Article 370) हटवल्यानंतर सुरक्षा दलं आक्रमक झाली आहे. वर्षभरापूर्वी 5 ऑगस्ट 2019ला हे कलम हटविण्यात आलं होतं. त्यानंतर राज्यात कशी परिस्थिती असेल अशी चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र काही महिन्यांचा अपवाद वगळता राज्यात शांतता निर्माण करण्यात सुरक्षा दलाला यश आलंय. तर दहशतवाद्यांविरुद्ध अतिशय आक्रमक भूमिका घेतली असून गेल्या 11 महिन्यांमध्ये केलेल्या कारवाईत तब्बल 200 दहशतवादी ठार झाल्याची माहिती जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी रविवारी दिली. रविवारी (01 नोव्हेंबर) झालेल्या चकमकीत हिज्जबुल मुदाहीद्दीनचा नंबर वन कमांडर डॉ. सैफुल्ला हा मारला गेला. तो ऑक्टोबर 2014पासून राज्यात दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता. दहशतवाद्यांचा मारला गेलेला पोस्टर बॉय बुऱ्हाण वाणी याच्यासोबतही त्याने काम केलं होतं. गेल्या दोन दिवसांपासून सुरक्ष दलं सैफुल्लाच्या मागावर होती. श्रीनगरजवळच्या रंग्रेट भागात हा दहशतवादी आला असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने तो लपलेल्या घराला वेढा दिला. त्यानंतर कारवाईला सुरूवात झाली. पोलिसांनी त्याला शरण येण्याचं आवाहन दिलं. मात्र तो शरण आला नाही. त्याने गोळीबार सुरू केला. या गोळीबारात सैफुल्ला मारला गेला. सुरवातीला तो सौफुल्लाच आहे की नाही या बद्दल खात्री नव्हती. नंतर सुरक्षा दलाने त्याची ओळख पटवली. तो या भागात येणार असल्याची माहिती स्थानिक खबऱ्यांनी दिली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने ऑपरेशन आखून ते फत्ते केलं. गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांच्या जम्मू-काश्मीरमध्ये कुरापती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्च ऑपरेशन करून त्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाकडून मोठी मोहीम राबवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांमधील एक म्होरक्या मारला गेल्याचीही माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली होती. ड्रोन हल्ल्याचा कट उधळला काश्मीरमधल्या दहशतवाद्यांना पाकिस्तान मदत करतो ही बाब आता काही नवीन राहिलेली नाही. या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणं, आर्थिक मदत करणं आणि शस्त्र पुरवठा करण्याचं काम पाकिस्तान गेली कित्येक दशके करत आहे. पाकिस्तानचा एक आणखी डाव भारतीय सुरक्षा दलांनी काही दिवसांपूर्वीच उधळून लावला आहे. ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तान काश्मीरातल्या दहशतवाद्यांना शस्त्र पुरवठा करतो हे स्पष्ट झालं असून लष्कर ए तोयबाच्या 3 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पाकिस्तानमधून या दहशतवाद्यांना राजौरी जिल्ह्यातल्या दुर्गम भागात ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रे पाठविण्यात आली होती. ती शस्त्रे आणण्यासाठी हे दहशतवादी निघाले होते त्यांना अटक करण्यात आली आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Jammu and kashmir

    पुढील बातम्या