एका पर्वाचा अस्त, एम. करूणानिधी यांचं निधन

एका पर्वाचा अस्त, एम. करूणानिधी यांचं निधन

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम. करूणानिधी यांचं निधन झालंय.

  • Share this:

चेन्नई, 6 ऑगस्ट : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा आणि दक्षिण भारतातले प्रसिद्ध नेते करूणानिधी यांचं प्रदीर्घकाळाने निधन झालं. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिनाभरापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर चेन्नईच्या कावेरी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचाराला योग्य प्रतिसाद मिळत नसल्यानं डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली होती. अखेर करूणानिधी यांची आज संध्याकाळी प्राणज्योत मालवली. करूणानिधी यांच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण तामिळनाडू शोकसागरात बुडाला. दक्षिण भारतातल्या राजकारणाशिवाय साहित्य क्षेत्रातही करूणानिधी यांचं मोठं योगदान आहे.

२८ जुलै रोजी त्यांचा रक्तदाब वाढल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र ,त्यांची प्रकृती जास्त खालावली. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत असली तरी, मंगळवारी त्यांची प्रकृती आणखी खालावली गेली. त्यांचे महत्त्वपूर्ण अवयव सुरू ठेवणे डॉक्टरांसमोर आव्हान ठरले होते. त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टम (व्हेंटिलेटर)वर ठेवण्यात आले  होते. अखेर संध्याकाळी एम.करूणानिधी यांनी अखेरचा श्वास घेतला. डाॅक्टरांनी माहिती दिल्यानंतर चेन्नईत शोककळा पसरली. त्यांच्या चाहत्यांनी एकच आक्रोश केला. खबदरदारी म्हणून चेन्नईत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.

मुत्तुवेल करूणानिधि या नावाभोवती गेली सहा दशकं तामिळनाडूचं राजकारण फिरत होतं. 60 वर्षांच्या कारकिर्दीत पाच वेळा तामिळनाडूचं मुख्यमंत्रीपद हे त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचं गमक सांगून जातं. 3 जून 1924 ला जन्मलेले करूणानिधी तमिळ सिनेमा जगतात एक प्रसिद्ध नाटककार आणि पटकथा लेखक म्हणून ख्यातकिर्त होते. कलाईनार अर्थात कलेतला विद्वान या टोपण नावानंही ते तामिळ जनतेत लोकप्रिय होते.

तामिळनाडूमध्ये सामाजिक स्तरावर सुधारणा आंदोलनाची मोठी परंपरा आहे. रामास्वामी पेरियार यांनी जात आणि लिंग आधारित भेदभावाविरोधात सुरू केलेलं  द्रविड आंदोलन प्रसिद्ध आहे. याच द्रविड आंदोलनाशी प्रभावित होऊन करूणानिधी पुढे आले. आपल्या बुद्धी आणि भाषण कौशल्यानं ते लवकरच प्रभावी राजकीय नेते बनले. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षीच त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि तेव्हापासूनच ते तामिळनाडूच्या राजकारणात पाय रोवून आहेत.

1957 साली पहिल्यांदा ते तामिळनाडू विधानसभेवर निवडून गेले. 1969 मध्ये तत्कालीन डीएमके अध्यक्ष आणि तत्कालीन मुख्यमंत्री अण्णादुराईंच्या मृत्यूनंतर ते डिएमकेचे प्रमुख बनले आणि पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. त्यानंतर 1971, 1989, 1996 आणि 2006 असं पाच वेळा ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. 1957 पासून आजतागायत करूणानिधी सलग बारा वेळा विधानसभेवर निवडून आले. केंद्रातल्या यूपीए सरकारमध्येही त्यांच्या पक्षानं महत्त्वाची भूमिका पार पाडली.

संबंधित बातम्या

पटकथा लेखक ते मुख्यमंत्री, करुणानिधींचा जीवनप्रवास

PHOTOS : 3 पत्नी आणि 6 मुलं, करुणानिधींच्या आयुष्यातील 8 गोष्टी

First published: August 7, 2018, 6:49 PM IST

ताज्या बातम्या