इंद्राणी मुखर्जीसमोर बसवून कार्ती चिदंबरमची करणार उलट तपासणी

इंद्राणी मुखर्जीसमोर बसवून कार्ती चिदंबरमची करणार उलट तपासणी

कार्ती चिदंबरमला पुढील चौकशीसाठी सीबीआयनं मुंबईत आणलं आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणी कार्ती चिबंदरम सध्या सीबीआय पोलिस कोठडीत आहेत.

  • Share this:

04 मार्च : कार्ती चिदंबरमला पुढील चौकशीसाठी सीबीआयनं मुंबईत आणलं आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणी कार्ती चिबंदरम सध्या सीबीआय पोलिस कोठडीत आहेत. कार्ती चिदंबरमची चौकशी इंद्राणी मुखर्जीसोबत केली जाणार  असल्याची न्यूज 18ची माहिती आहे. मुंबईच्या जेलमध्ये  इंद्राणीसमोर बसवून कार्तीची उलटतपासणी करण्यात येणार आहे, असं कळतंय. इंद्राणी आणि पिटर मुखर्जी आयएनएक्स मीडियाचे संस्थापक आहेत.

विशेष न्यायालयानं कार्ती चिंबरमच्या पोलिस कोठडीत याआधीच 6 मार्चपर्यंत वाढ केलीय.आयएनएक्स मीडिया लाच प्रकरणी अटक झालेल्या माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम यांचा मुलगा कार्ती चिंदबरम याला 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती.

आयएनएक्स मीडिया प्रकरण हे आठ वर्ष जुनं असून त्याची चौकशी खुद्द पी.चिदंबरम अर्थमंत्री असताना सुरू झाली होती. यामध्ये कार्ती चिदंबरम याच्या 10 लाखांची लाच घेतल्याचा आरोप आहे. तसंच सीबीआयला चौकशीत तो कुठलीच मदत तर करत नव्हताच. उलट आयएनक्स मीडियाच्या तपास प्रक्रियेत राजकीय दबावाच्या साहाय्याने कार्ती अडथळे आणत असल्याचा आरोप सीबीआयने केला होता. याप्रकरणी बुधवारी त्याला सीबीआयने चेन्नईत अटक केली होती.

 

First published: March 4, 2018, 9:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading