आयएनएक्स मीडिया प्रकरणी कार्ती चिंदबरमला पाच दिवसांची सीबीआय कोठडी

आयएनएक्स मीडिया प्रकरणी कार्ती चिंदबरमला पाच दिवसांची सीबीआय कोठडी

आयएनएक्स मीडिया प्रकरण हे आठ वर्ष जुनं असून त्याची चौकशी खुद्द पी.चिदंबरम अर्थमंत्री असताना सुरू झाली होती. यामध्ये कार्ती चिदंबरम याच्या 10 लाखांची लाच घेतल्याचा आरोप आहे

  • Share this:

चेन्नई,01 मार्च: आयएनएक्स मीडिया लाच प्रकरणी अटक झालेल्या माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम यांचा मुलगा कार्ती चिंदबरम याला 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. आता 6 मार्चपर्यंत ते सीबीआय कोठडीत राहणार आहेत.

आयएनएक्स मीडिया प्रकरण हे आठ वर्ष जुनं असून त्याची चौकशी खुद्द पी.चिदंबरम अर्थमंत्री असताना सुरू झाली होती. यामध्ये कार्ती चिदंबरम याच्या 10 लाखांची लाच घेतल्याचा आरोप आहे. तसंच सीबीआयला चौकशीत तो कुठलीच मदत तर करत नव्हताच. उलट आय़एनक्स मीडियाच्या तपास प्रक्रियेत राजकीय दबावाच्या साहाय्याने कार्ती अडथळे आणत असल्याचा आरोप सीबीआयने केला होता. याप्रकरणी बुधवारी त्याला सीबीआयने चेन्नईत अटक केली होती.

आज न्या. सुनील राणा यांनी विशेष सीबीआय कोर्टात कार्ती चिदंबरम आणि सीबीआय या दोघांचीही बाजू ऐकून घेतली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाच्या तपासणीसाठी कार्तीला कोठडीत पाठवणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं.

आता या तपासातून  काही नवीन निष्पन्न होतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 1, 2018 08:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading