कर्नाटक सरकार सुरू करणार नवीन टी.व्ही चॅनल

हे टी. व्ही. चॅनेल ग्रामीण विकास पंचायतराज खात्यातर्फे चालवण्यात येणार आहे. टी. आर. मीडिया एंटरटेनमेंट प्रा. लि.तर्फे हे चॅनेल प्रसारित करणार आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 8, 2017 09:50 AM IST

कर्नाटक सरकार सुरू करणार नवीन टी.व्ही चॅनल

बेंगळुरू, 08 सप्टेंबर: कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. आता सरकारी योजना आणि कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी कर्नाटक राज्य सरकार 'ग्राम स्वराज' हे नवीन टी. व्ही. चॅनेल सुरू करणार आहे.

टी.व्ही चॅनलचा प्रस्ताव कर्नाटक सरकारतर्फेच तयार करण्यात आला आहे. हे  टी. व्ही. चॅनेल ग्रामीण विकास पंचायतराज खात्यातर्फे चालवण्यात येणार आहे. टी. आर. मीडिया एंटरटेनमेंट प्रा. लि.तर्फे हे चॅनेल प्रसारित करणार आहे. या चॅनलसाठी कर्नाटक सरकार 10 कोटींची गुंतवणूक करणार आहेत. यासाठी दरमहा 1.5 कोटी रुपयांचा खर्चही येणार आहे. सरकारी योजनांबद्दल जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी सरकारतर्फेच चालविण्यात येणाऱ्या टी.व्ही. चॅनेलची गरज असल्याचं कर्नाटक राज्याचे ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2017 09:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...