कर्नाटकात भाजपच्या विजयामुळे रुपयाचा भाव वधरला

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमताकडे वाटचाल करीत आहे. त्याच्या या यशामुळे, भारतीय रुपयाची किंमत पुन्हा एकादा वाढली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: May 15, 2018 01:43 PM IST

कर्नाटकात भाजपच्या विजयामुळे रुपयाचा भाव वधरला

15 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमताकडे वाटचाल करीत आहे. त्याच्या या यशामुळे, भारतीय रुपयाची किंमत पुन्हा एकादा वाढली आहे. मध्यंतरी रुपयाची घसरण झाली होती, पण भाजपच्या यशानंतर 30 पैशांनी पुन्हा बळकटी मिळाली आहे.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, कर्नाटकमध्ये भाजपच्या जोरदार शक्तीप्रदर्शनामुळे गुंतवणुकदार पुन्हा भारताकडे वळाले आहेत. त्यामुळे आता त्यांनी पुन्हा भारतीय रुपयांची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतीय रुपयासमोर आता अमेरिकेचा डॉलर कमजोर पडला आहे.

दरम्यान, मंगळावारी सकाळी रुपयाची किंमत कमी होती. पण जसंजसं भाजपला बहुमत मिळत गेलं तसं शेअर बाजाराती उसळी पहायला मिळाली. डॉलरच्या तुलनेत रुपया 17 पैशांनी घसरून 67.68 रुपये प्रति डॉलरवर पोहोचला आहे.

का वाढली रुपयाची किंमत?

- कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपची आघाडी आहे. भाजपच्या पारड्यात संपूर्ण बहुमत आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारतही पहायला मिळाला.

- कर्नाटकच्या विजयानंतर आणि मोदींच्या आंतराराष्ट्रीय संबंधामुळे विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेत पुन्हा गुंतवणुकीला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे आजच रूपयांमध्ये एक चांगली कमाई पहायल मिळतेय.

- विदेशी गुंतवणूकदारांना भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करण्यासाठी डॉलर विकून रुपया खरेदी करायाचा आहे. त्यामुळे रुपयांच्या मागणीत वाढ झाल्याने रुपयाची किंमतही वाढली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 15, 2018 01:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close