सत्तेचं कर'नाटक',काँग्रेस-जेडीएसची युती ; भाजपचं सत्तेचं स्वप्न भंगणार ?

सत्तेचं कर'नाटक',काँग्रेस-जेडीएसची युती ; भाजपचं सत्तेचं स्वप्न भंगणार ?

  • Share this:

कर्नाटक, 15 मे : "सत्ता हे विष असतं" असं म्हटलं जातं पण कर्नाटकात सत्तेसाठी मोठा ड्रामा पाहण्यास मिळालाय.  कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. पण, काँग्रेस आणि जेडीएसने हातमिळवणी करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला असून थोड्याच वेळात सत्तेसाठी दावा करणार आहे.

भाजपने 104 जागा जिंकून दक्षिणेतले एंट्री घेतली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला. पण 114 जागांवर आघाडी घेणारा भाजपचा अंतिम निकाल हा 104 जागांवर येऊन थांबला. हीच संधी साधून काँग्रेसने आक्रमक खेळी करत जेडीएसला पाठिंबा जाहीर केला. एवढंच नाहीतर काँग्रेसने जेडीएसचे एचडी कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची आॅफर दिली. तसंच 20 मंत्रिपदं काँग्रेसची आणि 14 मंत्रिपद जेडीएसची असा फाॅर्म्युलाही दिला. जेडीएसने काँग्रेसच्या फाॅर्म्युला स्विकारला. अंतिम निकाल स्पष्ट होण्याच्या आधीच काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी थेट राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेतली. पण निकाल जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा करू शकत नाही असं राज्यपालांनी स्पष्ट केलं. पण आकडेवारी जवळपास स्पष्टच झाली होती. काँग्रेसचे नेते सिद्धरामय्यांनी सत्ता स्थापनेचं पत्र राज्यपलांकडे सुपूर्द केलंय.

असं जुळलं समिकरण

काँग्रेसच्या 78 आणि जेडीएस 38 तर एका अपक्षाला घेऊन काँग्रेस-जेडीएस युतीच्या 116 जागा झाल्यात. बहुमतासाठी 112 जागांची गरज असते. ती या युतीने पूर्ण केली. काँग्रेसने या युतीच्या बदल्यात काँग्रेसने मुख्यमंत्रीपदासह 14 मंत्रिपदं जेडीएसला देण्याचं ठरवलं.

अखेर जेडीएसने काँग्रेसची आॅफर स्विकारली आणि काँग्रेससोबत घरोबा करत सत्तेवर विराजमान होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 15, 2018 05:32 PM IST

ताज्या बातम्या