18 वर्षीय मुलाने ब्लॅक पँथरचा फोटो काढण्यासाठी 9 हजार तास पाहिली वाट

अनेकजण फोटोग्राफी करतात. परंतु अद्भुत फोटो काढण्याची कला आणि प्रतिभा काही व्यक्तींमध्येच असते.

अनेकजण फोटोग्राफी करतात. परंतु अद्भुत फोटो काढण्याची कला आणि प्रतिभा काही व्यक्तींमध्येच असते.

  • Share this:
    नवी दिल्ली, 15 डिसेंबर : वाईल्डलाईफ फोटोग्राफी (wildlife photography) हा खूप संयमाचा छंद आहे. यासाठी खूप काळ वाट पाहावी लागते. त्यासाठी खूप प्रोफेशनल शिक्षण देखील आवश्यक आहे. या प्रकारची फोटोग्राफी करणे प्रत्येकाचे काम नाही. अनेकजण फोटोग्राफी करतात. परंतु अद्भुत फोटो काढण्याची कला आणि प्रतिभा काही व्यक्तींमध्येच असते. काही महिन्यांपूर्वी कर्नाटकमधील(Karnataka) काबिनी नॅशनल पार्कमध्ये ब्लॅक पँथर(black panther) आढळून आला होता. हा फोटो त्यावेळी Shaaz Jung नावाच्या फोटोग्राफरने काढला होता. भारतात केवळ 6 ब्लॅक पँथर असून यामधील एक कर्नाटकमधील काबिनी नॅशनल पार्कमध्ये (Kabini National Park) आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांना मोगली (mogli) सिनेमातील बगिरा(bagheera) देखील म्हटलं होतं. रुडयार्ड किपलिंगच्या जंगल बूक या इंग्रजी पुस्तकावर हा सिनेमा आधारित आहे. त्यातील काळ्या रंगाच्या पँथरचं नाव बगिरा आहे. आता आणखी एका 18 वर्षीय मुलाने देखील त्याचा फोटो काढला असून यासाठी त्याने खूप कष्ट घेतले आहेत. कर्नाटकच्या विजापूरमधील(Vijapur) 18 वर्षीय ध्रुव पाटील याने ब्लॅक पँथरचा हा फोटो काढला असून त्याने यासाठी खूप संयम राखून वाट पहिली. त्याने हा फोटो काढण्यासाठी जवळपास 9 हजार मिनिटे वाट पहिली आहे. याची तुलना केल्यास हा काळ 150 तास किंवा 7 दिवस इतका होत आहे. त्यामुळे इतका दीर्घवेळ वाट पाहिल्यानंतर त्याला हा फोटो काढण्यात यश आलं आहे. त्याला आपल्या कॅमेऱ्यात या ब्लॅक पँथरला कैद करण्याची इच्छा होती. परंतु त्याला अद्यापपर्यंत यामध्ये यश आले नव्हते. यासाठी त्याने 25 वेळा या नॅशनल पार्कला भेट दिली. यामध्ये त्याने 9 हजार मिनिटे वेळ खर्च केला. अनेकदा त्याला यामध्ये अपयश आले. परंतु त्याने अखेर हार न मानता आपल्या कॅमेऱ्यात या ब्लॅक पँथरला कैद करण्यात यश मिळवले. कैमारा नावाच्या या रस्त्यावर त्याने हा वेळ घालवत या पँथरची वाट पहिली आहे. याविषयी त्याने स्थानिक प्रसार माध्यमांमध्ये माहिती दिली असून आपल्या आयुष्यातील हे सर्वात उत्तम दिवस असल्याचे म्हटले आहे. कर्नाटकमधील काँग्रेस(congress) नेते आणि माजी मंत्री एम. बी. पाटील(MB PATIL) यांचा ध्रुव हा मुलगा आहे. त्याला जंगली प्राण्यांची देखील आवड असून म्हैसूरमधील प्राणिसंग्रहालयातील अनेक प्राणी त्याने दत्तक घेतले असून घरी देखील अनेक पक्षी पाळले आहेत.
    Published by:Akshay Shitole
    First published: