कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी ओढली महिलेची ओढणी VIDEO VIRAL

सोमवारी तक्रारीसाठी आलेल्या एका महिलेवर ते भडकले आणि त्यांचा संयम सुटला.

News18 Lokmat | Updated On: Jan 28, 2019 05:30 PM IST

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी ओढली महिलेची ओढणी VIDEO VIRAL

बंगळूरू 28 जानेवारी : कर्नाटकचं राजकारण आणि राजकारणी सध्या सतत वादात सापडत आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या हे आपल्या तापट स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. त्याचा राग कधी कुणावर फुटेल याची काही शाश्वती नसते. सोमवारी तक्रारीसाठी आलेल्या एका महिलेवर ते भडकले आणि त्यांचा संयम सुटला.


एका कार्यक्रमानंतर सिद्धरामय्या हे लोकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी बसले होते. त्यावेळी एका महिलेने तक्रार सांगत असताना त्यांच्याशी वाद घातला. अनेकदा तक्रारी करूनही काहीच होत नाही. मला सारखे खेटे घालावे लागतात अशी त्या महिलेची तक्रार होती. ती महिला सारखा आपला मुद्दा रेटत असल्याने सिद्धरामय्यांचा तोल गेला.


त्यांनी त्या महिलेला शांत राहा असं बजावलं आणि तिच्या हातातला माईक खाली खेचण्याचा ते प्रयत्न करू लागले.  हे करताना त्यांनी महिलेच्या अंगावरची ओढणीच हाताने खाली खेचली. सिद्धरामय्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे.

Loading...

CM कुमारस्वामींनी दिली राजीनाम्याची धमकी


कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारवर अस्थिरतेचे संकट निर्माण झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी थेट राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. कुमारस्वामी यांच्या मते काँग्रेसचे आमदार सीमा ओलांडत आहेत.


राज्यातील काँग्रेस आणि जेडीएस सरकारच्या स्थापनेपासून सुरु असलेले संकट अद्याप कमी झाले नाही. काँग्रेसच्या काही आमदारांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनाच आपले मुख्यमंत्री असल्याचे विधान केले होते. काँग्रेस आमदारांच्या या विधानानंतर कुमारस्वामी यांनी राजीनामा देण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले.


काँग्रेस नेत्यांनी यावर विचार करावा. जर त्यांना असे करायचे असेल तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. काँग्रेसचे आमदार सीमा ओलांडत आहेत. यामुळे त्यांचेच नुकसान होणार आहे. काँग्रेस नेत्यांनी पक्षातील आमदारांना नियंत्रणात ठेवले पाहिजे, असेही कुमारस्वामी म्हणाले.


दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते जी.परमेश्वर यांनी मात्र कुमारस्वामी सर्वात चांगले मुख्यमंत्री आहेत असे विधान केले. काँग्रेसच्या आमदारांचे ते नेते आहेत. आमदारांसाठी कुमारस्वामीच मुख्यमंत्री आहेत. त्यांनी केवळ मत मांडले. यात चुकीचे काही नाही. आम्ही (काँग्रेस) मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या कामावर खुश आहोत, असे परमेश्वर यांनी सांगितले.


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2019 05:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...