• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • कर्नाटकातील राजकीय ड्रामा; विधानसभा अध्यक्षांकडून 14 आमदारांचे राजीनामे नामंजूर !

कर्नाटकातील राजकीय ड्रामा; विधानसभा अध्यक्षांकडून 14 आमदारांचे राजीनामे नामंजूर !

कर्नाटकातील 14 आमदारांचे राजीनामे आता विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी नामंजूर केले आहेत.

 • Share this:
  बंगळुरू, 09 जुलै : कर्नाटकातील राजकीय ड्राम्याचा सस्पेंन्स आता आणखी वाढला आहे. विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी काँग्रेस – जेडीएसच्या 14 आमदारांचे राजीनामे नामंजूर केले आहेत. मी अध्यक्ष असल्यानं माझ्यावर जबाबदारी आहे. मला नियमानुसार काम करावे लागेल आणि मी योग्य तो निर्णय घेईन असं विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी म्हटलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे आता कर्नाटकातील राजकीय पेच कायम आहे. 2018मध्ये काँग्रेस – जेडीएसनं सत्ता स्थापन केली. त्यानंतर अवघ्या 13 महिन्यात आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे काँग्रेस – जेडीएस सरकार अस्थिर झालं. या आमदारांच्या मनधरणीचा प्रयत्न देखील झाला. पण, आपल्या राजीनाम्यावर मात्र 14 आमदार ठाम आहेत. पण, विधानसभा अध्यक्षांनी 14 आमदारांचे राजीनामे अद्याप स्वीकारले नाहीत. World Cup: भारत – न्यूझीलंड मॅचवर 1500 कोटींची सट्टा ! भाजपची सत्ता स्थापनेची तयारी कर्नाटकमध्ये 14 आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर आमदारांनी मुंबई गाठली. त्यानंतर त्यांना गोवा इथे हलवण्यात आलं. दरम्यान, कुमारस्वामी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाची राजीनामा द्यावा अशी मागणी कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष येदीयुरप्पा यांनी केली. भाजपनं देखील सत्ता स्थापनेचा दावा केला असून 107 आमदारांचं पाठबळ असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. 2018मध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस – जेडीएसनं सत्ता स्थापन केली आणि एच. डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री केलं. आमदार बंगळुरूला परतणार विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयानंतर 14 आमदार बंगळुरूला परतणार आहेत. रात्रीपर्यंत हे आमदार बंगळुरूला परततील. विधानसभा अध्यक्षांनी प्रत्यक्ष भेटीशिवाय राजीनामा मंजूर केला जाणार नाही असा पवित्रा घेतला आहे. राहुल गांधींच्या राजीनाम्यावर 15 जुलैपूर्वी CWC घेणार हा निर्णय! ऑपरेशन लोटस 2018मध्ये सत्ता स्थापन न करता आल्यानं भाजपच्या मनात सल आहे. 2018पासून भाजपनं सहा वेळा काँग्रेस – जेडीएस सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना त्यामध्ये यश आलेलं नाही. आता 14 आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर देखील भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यास सज्ज झाला आहे. पण, विधानसभा अध्यक्षांनी 14 आमदारांचे राजीनामे नामंजूर केले आहेत. VIDEO: फेसबुक प्रेम पडलं महागात; ग्रामस्थांनी दहशतवादी समजून दिला चोप
  Published by:ram deshpande
  First published: