Home /News /national /

सभागृहात काँग्रेस नेत्यांनीच फाडले होते कपडे, विधान परिषदेच्या उपसभापती धर्मे गौडांनी रेल्वेखाली घेतली उडी!

सभागृहात काँग्रेस नेत्यांनीच फाडले होते कपडे, विधान परिषदेच्या उपसभापती धर्मे गौडांनी रेल्वेखाली घेतली उडी!

धर्मे गौडा यांचा मृतदेह आज पहाटे 2 वाजेच्या सुमारास जंगलमय भाग असलेल्या रेल्वे ट्रॅकवर आढळून आला.

    बंगळुरू, 29 डिसेंबर : कर्नाटक विधान परिषद ( Karnataka Vidhana Parishat) चे उपसभापती एसएल धर्मे गौडा (SL Dharme Gowda) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धर्मे गौडा यांचा मृतदेह हा त्यांच्या घरापासून निकमगलूरजवळील रेल्वे ट्रॅकवर छिन्नविछन्न अवस्थेत आढळून आला. न्यूज18 च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मे गौडा यांचा मृतदेह आज पहाटे 2 वाजेच्या सुमारास जंगलमय भाग असलेल्या रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. 64 वर्षीय गौडा यांना अलीकडेच विधानसभेत काँग्रेसच्या नेत्यांनी घेराव घातला होता. त्यामुळे ते चर्चेत आले होते. गौडा हे गैरप्रकारे सभागृहात घोषणा करत होते, असा आरोप काँग्रेसने केला होता. सभागृहातच काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार गोंधळ घातला होता. काही काँग्रेसच्या सदस्यांनी त्यांना खुर्चीवरून खाली खेचले होते. गौडा यांनी सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या सभागृहातील अध्यक्ष प्रताप चंद्र शेट्टी यांना मदत केली होती, असा आरोपही काँग्रेस नेत्यांनी केला होता. त्यानंतर आज धर्मे गौडा यांचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राजकीय वातावरण सुद्धा तापले आहे. कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण पेटले असून काँग्रेस अडचणीत येण्याची शक्यता आहे. धर्मे गौडा यांचे भाऊ  एसएल भोजे गौडा हे आमदार असून माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचे निकटवृतीय समजले जात आहे. दरम्यान,  उपसभापती धर्मे गौडा यांची सुसाईड नोट सापडली आहे. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या या नोटमध्ये गौडा यांनी आपल्या घरच्यांची माफी मागितली आहे. घराच अर्धवट बांधकाम मुलाने पूर्ण करावे, असं भावनिक आवाहन गौडा यांनी केले आहे. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या