बंगळुरू, 06 मार्च : भरधाव येणाऱ्या दोन कारच्या धडकेत 13 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. तवेरा कारमधून तमिळनाडूहून होसुरू मार्गाने यात्रेहू परतणाऱ्या भाविकांच्या कारला हा भीषण अपघात झाला. देवदर्शन आणि यात्रेला जाऊन घरी परतणाऱ्या भाविकांवर काळनं घाला घातला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल करून घटनास्थळाची पाहाणी केली आहे. कारचा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चुराडा झाला आणि 13 भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये एक वर्षाच्या चिमुकल्याचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यात कुनिगल टक इथे भधाव कारची दुसऱ्या कारला धडक बसली. दरम्यान स्थानिकांच्या माहितीनुसार कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. नियंत्रण सुटल्यामुळे गाडी थेट डिव्हायडर तोडून पलिकडून जाणाऱ्या गाडीवर धडकली.
हे सर्व भाविक देवदर्शन करून येत असताना हा भीषण अपघात झाला. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात इतका भयानक होता की यामध्ये 13 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या गाडीचा चुराडा झाल्यामुळे गाडीत अडकलेले मृतदेह गाडी कापून बाहेर काढावे लागले. यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चार जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याची माहिती मिळत आहे.
Published by:Akshay Shitole
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.