खून प्रकरणात 14 वर्ष जन्मठेप भोगली आणि नंतर झाला डॉक्टर

खून प्रकरणात 14 वर्ष जन्मठेप भोगली आणि नंतर झाला डॉक्टर

तुरुंगात असताना त्यानं पत्रकारीतेचा डिप्लोमा आणि पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्यानंतर 14 वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर MBBS करून आता तो वैद्यकीय सेवेत रूजू झाला.

  • Share this:

बंगळुरू, 15 फेब्रुवारी : लहानपणापासून त्याला डॉक्टर व्हायचं होतं पण आयुष्यात असं काही झालं की त्याला तुरुंगात जावं लागलं. एका खुनाच्या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. यात 14 वर्षे तुरुंगात काढावी लागली. दरम्यानच्या काळात त्यानं जे स्वप्न पाहिलं होतं ते तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर पूर्ण केलं. कर्नाटकातील सुभाष पाटील याची ही कहाणी. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यानं एमबीबीएसची डीग्री पूर्ण केली.

कलबुर्गी इथं राहणाऱ्या सुभाष पाटीलने तुरुंगात राहून स्वप्न पूर्ण केलं. डॉक्टर होऊन लोकांची सेवा करायची होती. पण एका खून प्रकरणात बंगळुरु पोलिसांनी अटक केली. त्यानंतर 14 वर्षांचा तुरुंगवास झाला. तुरुंगात गेल्यावर त्यानं डॉक्टर होण्याचं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल केली. सुभाषला नोव्हेंबर 2002 मध्ये बंगळुरु पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली.

सुभाषला जेव्हा अटक करण्यात आली होती तेव्हा तो कलबुर्गी इथल्या एमआर मेडिकल कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होता. त्यानंतर 2016 मध्ये त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे सुटका झाली. सेंट्रल जेलमधील रुग्णालयात त्याने डॉक्टरांना मदत केली. 2008 मध्ये तुरुंगात असतानाच त्याला आरोग्य विभागाकडून गौरवण्यात आलं होतं. जेलमध्ये असतानाच त्यानं पत्रकारीतेचा डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर 2010 मध्ये कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठातून पत्रकारीतेची पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आपण केलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप झाला. त्यानंतर केलेल्या कष्टाच्या जोरावर इथंपर्यंत पोहोचलो असल्याची भावना सुभाषने व्यक्त केली. 2019 मध्ये एमबीबीएस झाले. त्यानंतर एक वर्षाची इंटर्नशिप पूर्ण केली. चांगल्या वागणुकीमुळे सुटका केल्याबद्दल सुभाषने राज्य सरकार आणि राज्यपालांचे आभार मानले आहेत.

वाचा : कॉन्स्टेबल आईने विचारही नव्हता केला असं घडलं, लेकीनेच जन्मदात्रीला संपवलं

First published: February 15, 2020, 3:55 PM IST
Tags: karnataka

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading