अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून 'हा' तरुण करतोय कणसाची शेती

अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून 'हा' तरुण करतोय कणसाची शेती

सॉफ्टवेअर इंजिनियर सतीश कुमार 2 वर्षांपूर्वी अमेरिकेतून परत आले आणि आपल्या गावात शेती करीत आहे.

  • Share this:

कलबुर्गी, 07 सप्टेंबर : शेती म्हटलं की अनेकांची तोंड वाकडी होताता. अस्मानी संकट, पिकाला हमीभाव मिळणार की नाही असे अनेक प्रश्न मानत असल्यानं विशेष शेतीकडे लक्ष दिलं जात नाही. काही दिवसांपूर्वी लॉकडाऊमुळे नोकरी गेलेल्या एका तरुणानं झेंडुची बाग फुलवली होती. आता अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून एका सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणानं चक्क शेती केली आहे.

अमेरिकेत लाखो रुपयांची नोकरी सोडून सतीश कुमार हे आपल्या मूळ गावी कर्नाटकातील कलबुर्गी इथे आले. शेती करण्यासाठी त्यांनी हातात असलेली नोकरी सोडली आणि मायदेशी परतले.

सॉफ्टवेअर इंजिनियर सतीश कुमार 2 वर्षांपूर्वी अमेरिकेतून परत आले आणि आपल्या गावात शेती करीत आहे. सतीश म्हणतात, 'मी लॉस एंजेल्स, युनायटेड स्टेट्स आणि दुबईमध्ये काम करणारा सॉफ्टवेअर इंजिनियर होतो. अमेरिकेत मला वर्षाकाठी 1 लाख अमेरिकन डॉलर्स मिळत होते. पण तिथे काम करण्याचं समाधान मिळत नव्हतं.'

हे वाचा-जुन्नरमध्ये व्हायरल होतोय हा मनमोहक VIDEO, या रंगाच्या तुम्हीही पडाल प्रेमात

'काम करण्यात एक ऊर्जा आणि उत्साह नव्हता. कामात आव्हानं नव्हती आणि त्याशिवाय मला माझ्या आयुष्यात ज्या गोष्टी करायच्या होत्या त्यासाठी वेळ मिळत नव्हता. त्यामुळे मी सगळं सोडून पुन्हा गावी जाण्याचा निर्णय घेतला. 2 वर्षापूर्वी शेती सुरू केली. मागच्या महिन्यात मला 2 एकर जमिनीत केलेल्या शेतीतून 2.5 लाख रुपये मिळाले.'

अनेकदा आव्हानं किंवा संकट पाहूनच आधीच घाबरतात. मात्र गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून कणसाची शेती करण्यासाठी सतीश हे आपल्या कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील मूळ गावी परतले. दोन वर्षांच्या त्यांच्या मेहनतीनं त्यांना मोठं यश मिळालं. आज महिन्याकाठी 2 एकर जमिनितील उत्पादनातून त्यांना जवळपास 2.5 लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 7, 2020, 12:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading