बेंगळुरु, 14 मार्च : कर्नाटकातील एक सभेत बोलत असताना नातवाचे नाव घेताच माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नातू प्रज्ज्वलचे नाव येताच भावनिक झालेल्या देवेगौडा यांनी हातरुमालाने अश्रू पुसले.
देवेगौडा यांचा नातू प्रज्ज्वल रेवन्ना हासन मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. याच मतदारसंघातून स्वत: देवेगौडा निवडणूक लढवत होते. आता त्यांनी आपण निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली आहे.
देवेगौडा म्हणाले की, मी सर्व लोकांना प्राधान्य दिलं आहे. मी लिंगायत नेत्यांना एमएलसी केलं आहे. तरीही माझ्यावर मुलाला आणि नातवाला उमेदवारी दिल्याचा आरोप केला जात आहे. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत काम करत राहणार आहे. माझा वेळ वाया घालवणार नाही.
हासन मतदारसंघातील उमेदवारीवरुन कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि त्यांचे बंधू एचडी रेवन्ना यांच्यात मतभेद होते. जेव्हा कुमारस्वामींचा मुलगा निखिल याला मांड्या मतदारसंघातून उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आली तेव्हा त्यांच्यातील मतभेद वाढले. मात्र, आता हासन येथील उमेदवारी प्रज्ज्वलला देण्यात आली असून कुमारस्वामींच्या मुलाला इथली उमेदवारी देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
VIDEO: असं काय म्हणाले शरद पवार? ज्यामुळे पार्थनं घेतला काढता पाय