• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • कानडी पोलिसांची गुंडगिरी, मराठी भाषेचे स्टेट्स ठेवले म्हणून चौघांना अमानुष मारहाण

कानडी पोलिसांची गुंडगिरी, मराठी भाषेचे स्टेट्स ठेवले म्हणून चौघांना अमानुष मारहाण

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कानडीचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे.

  • Share this:
बेळगाव, 15 मार्च :  बेळगाव (Belgaum) सीमाभागात कर्नाटक सरकारच्या (Karnataka Government) पोलिसांची गुंडगिरी पाहण्यास मिळाली आहे. मराठी भाषिक तरुणांनी व्हॉट्सअॅपवर स्टेट्स (WhatsApp status) ठेवले म्हणून अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव येथील मच्छे गावातील हे चार तरुण आहे. या चारही तरुणांनी आपल्या व्हॉट्सअॅपवर मराठी भाषेचे स्टेटस ठेवले होते. 'मराठी भाषिक वाघ आहे' असे स्टेट्स होते. IPL 2021 : धोनीनं सांगितली रोहितची खास गोष्ट! Viral Look चे रहस्य उघड; VIDEO या चारही तरुणांचे व्हॉट्सअॅप स्टेट्स पाहून कानडी पोलिसांनी जाब विचारला आणि बेदम मारहाण केली. पाठी, हात आणि पायांवर बेल्ट आणि काठीने अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीचे वर्ण तरुणांच्या अंगावर उमटले आहे. कानडी पोलिसांच्या अमानुष अत्याचारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अजून किती दिवस कानडी जुलूमशाही सुरू राहणार?  असा संतप्त सवाल स्थानिक मराठी भाषिक नागरिक विचारत आहे. कोल्हापुरात कानडी मुद्यावरून शिवसेना आक्रमक दरम्यान, कोल्हापुरात कन्नडच्या मुद्द्यावरुन शिवसेना आक्रमक होत असल्याचं दिसत आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांचा एक व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये त्यांनी व्यावसायिकांना आव्हान दिलं आहे. यापुढे कोल्हापूर जिल्ह्यात एकही कन्नडचा बोर्ड दिसला तर त्यावर शिवसेना स्टाइल कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. VIDEO: कथित भाजप नेत्याची दादागिरी; महिला अन् तिच्या मुलीला हॉकी स्टिकनं मारहाण महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कानडीचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा कर्नाटकात जाळण्यात आल्यानंतर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला होता. यावेळी कोल्हापूरमधील एका थिएटरमध्ये घुसून कन्नड चित्रपटाचा शो बंद पाडण्यात आला होता. या प्रकरणात शिवसैनिकांनी भीमाशंकर यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढल्यानंतर संतप्त झालेल्या कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बेळगावातील दुकानांवर असलेले मराठी फलक तोडले होते. त्यानंतर आता शिवसैनिकांनी कोल्हापूरातील कन्नड बोर्डावर काळ फासलं आहे.
Published by:sachin Salve
First published: