Home /News /national /

मंदिरांच्या दानपेटीत टाकायचा वापरलेले कंडोम, पकडल्यावर सांगितलं धक्कादायक कारण

मंदिरांच्या दानपेटीत टाकायचा वापरलेले कंडोम, पकडल्यावर सांगितलं धक्कादायक कारण

मंदिरांच्या दानपेटीत वापरलेले कंडोम टाकणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी (Police)अटक केली आहे.

    बंगळुरू, 01 जानेवारी: मंदिरांच्या दानपेटीत वापरलेले कंडोम (Condom) टाकणाऱ्या एका व्यक्तीला कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police)अटक केली आहे. देवदास देसाई असं आरोपीचं नाव आहे. येशूचा संदेश देण्यासाठी आपण हे करत असून त्याचा आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचं आरोपी देवदास देसाई याने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं. जवळपास वर्षभरापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. आरोपी देसाई मंदिर परिसर आणि तिथे ठेवण्यात आलेल्या दानपेटीत वापरलेले कंडोम टाकून निघून जायचा. प्रत्येक वेळी चकवा देऊन निघून जायचा 'द सन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार पोलिसांनी सांगितलं की, 62 वर्षीय आरोपी देवदास देसाईने मंगळुरूच्या अनेक मंदिरांमध्ये (Temples) हे कृत्य केले आहे. बराच वेळ त्याचा शोध सुरू होता, पण प्रत्येक वेळी तो पळून जाण्यात यशस्वी व्हायचा. गेल्यावर्षी 27 डिसेंबर रोजी कोरजना कट्टे (Korajjana Katte Village) गावातील एका मंदिराच्या दानपेटीत वापरलेला कंडोम (Used Condom)मिळाल्याची चर्चा होती. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आता खातोय तुरुंगाची हवा घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मंदिर आणि परिसरात बसवलेले कॅमेरे तपासले. अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात आरोपीचा चेहरा दिसत होता. त्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीत देवदास देसाईने अशाप्रकारे अनेक मंदिरे अस्वच्छ केल्याचं मान्य केलं. एकूण 18 मंदिरांमध्ये त्याने हे कृत्य केल्याचे आरोपीने सांगितलं. मात्र यापैकी केवळ पाच मंदिरांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. पत्नी आणि मुलांना सोडून दिलं आरोपीनं मंगळुरूचे पोलीस आयुक्त एन शशीकुमार (Mangaluru Police Commissioner N Shashikumar)यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांचे पथक आरोपीला पकडण्यात यशस्वी झाले. देवदास देसाईनं त्यांच्या पत्नी आणि मुलांना फार पूर्वीच सोडून दिलं आहे. तो ऑटो ड्रायव्हर म्हणून काम करायचा, पण म्हातारपणामुळे त्याने ड्रायव्हिंग सोडून प्लास्टिक पिकरचं काम करायला सुरुवात केली. आरोपीने सांगितले की, वडिलांच्या काळापासून हे कुटुंब ख्रिश्चन धर्माचे पालन करत आहे. म्हणून दानपेटीत टाकायचा कंडोम आयुक्त शशीकुमार यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने सांगितले की, तो मंदिरांमध्ये वापरलेले कंडोम फेकत असे जेणेकरून त्यांची विटंबना करून तो लोकांना त्याच्या धर्माकडे वळवू शकेल. केवळ मंदिरातच नाही तर काही गुरुद्वारा आणि मशिदींमध्येही आरोपींनी हे कृत्य केले. चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, त्याला त्याच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही. तो फक्त येशूचा संदेश पसरवत होता. आरोपीने असेही म्हटले की, बायबलमध्ये येशूशिवाय दुसरा देव नाही असे म्हटले आहे. मी कंडोम फेकत असे कारण अशुद्ध वस्तू फक्त अशुद्ध ठिकाणीच टाकल्या पाहिजेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Karnataka

    पुढील बातम्या