नवरीच्या साडीचा रंग न आवडल्यामुळे रुसली 'वरमाई', लग्न मोडून नवरोबाही पसार

नवरीच्या साडीचा रंग न आवडल्यामुळे रुसली 'वरमाई', लग्न मोडून नवरोबाही पसार

नवऱ्यामुलाच्या आई-वडिलांना मुलीची साडी आवडली नाही, म्हणून लग्न मोडल्याचं कधी तुम्ही ऐकलं आहे का? हो, असं घडलं आहे. इतकच नव्हे या घटनेनंतर नवरोबा देखील पसार झाला आहे. वाचा सविस्तर बातमी

  • Share this:

हासन, 8 फेब्रुवारी : आपल्या देशामध्ये ‘वरमाई’ला रुसायला काही कारण लागत नाही. देशातील अनेक भागात तर हुंड्याची समस्या इतकी गंभीर आहे, की साध्या साध्या गोष्टी नाही दिल्या म्हणून लग्न मोडतात. अनेक सिनेमांमध्ये सुद्धा आपण पाहतो की अनेक कारणांवरून लग्न मोडली जातात. पण नवऱ्यामुलाच्या आई-वडिलांना मुलीची साडी आवडली नाही, म्हणून लग्न मोडल्याचं कधी तुम्ही ऐकलं आहे का? हो, असं घडलं आहे. इतकच नव्हे या घटनेनंतर नवरोबा देखील पसार झाला आहे. असंही नाही की दोघांचं बळजबरीने लग्न लाऊन देण्यात येत होतं.दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि घरच्यांच्या संमतीने लग्न ठरलं होतं. मात्र आई-वडिलांना मुलीची साडी पसंत पडली नाही आणि पुढचा सगळा प्रकार घडला.

घटना आहे कर्नाटक राज्यातील हासन या जिल्ह्यातील. याठिकाणचे एसपी श्रीनिवास गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार बीएन रघुकुमार आणि संगीता एकमेकांना गेली 1-2 वर्ष ओळखत होते. दोघांमध्ये प्रेम झालं आणि त्यांनी एकमेकांसोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या. घरच्यांनीही दोघांच्या लग्नाला परवानगी दिली. लग्न ठरलं आणि बुधवारी जेव्हा या दोघांच्या लग्नाचे विधी सुरू होते, त्यावेळी मुलाच्या आईवडिलांनी साडीबाबत नाराजी व्यक्त केली. साडी चांगल्या दर्जाची नसल्याचं व्यक्त करत त्यांनी लग्न मोडलं.

(हेही वाचा : घरच्यांनी प्रेमाला नाकारलं, मुलीने मुलाचं घरं गाठलं पण...)

संगीताला रघुकुमारच्या आई-वडिलांनी भर लग्नात साडी बदलण्यास सांगितलं. यावेळी दोन्ही कुटुंबांमध्ये बाचाबाची झाली. भांडण एवढं टोकाला पोहोचलं की यादरम्यान नवरा मुलगा केव्हा गायब झाला हे कुणाच्याच लक्षात नाही आलं. रघुकुमारचा अद्याप काही पत्ता नाही आहे. पोलिसांनी रघुकुमारच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

First published: February 8, 2020, 2:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading