LIVE NOW

आम्ही उद्या बहुमत सिद्ध करू, सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर येडियुरप्पा यांचा दावा

काँग्रेस-जेडीएसच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. येडियुरप्पा यांनी उद्या 4 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे येडियुरप्पा यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे असं म्हणायला हरकत नाही.

Lokmat.news18.com | May 19, 2018, 2:09 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated May 19, 2018
auto-refresh

Highlights

Load More
मुंबई, 18 मे : कर्नाटकच्या तिढ्याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झालीये. मुकुल रोहतगी यांनी येडिरुप्पांना आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर केलं. पण त्यात आमदारांच्या नावांचा उल्लेखच नाहीये. त्यामुळे कोर्ट हे पत्र ग्राह्य धरतं का, ते पहावं लागेल. अभिषेक मनु सिंघवी काँग्रेसची बाजू मांडतायेत. पी. चिदंबरम, शांती भूषण, राम जेठमलानी हे दिग्गज वकीलही सुनावणीला उपस्थित आहेत. न्यायमूर्ती ए एस सिक्री, न्यायमूर्ती एस एम बोबडे आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर सुनावणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये येडियुरप्पा यांनी सरकार स्थापनेचा दावा करणारं राज्यपालांना दिलेलं पत्र आणि राज्यपालांनी त्यांना दिलेलं सरकार स्थापनेच्या निमंत्रणाच्या पत्राचा समावेश आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट नेमका काय निकाल देणार याकडेच संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सुप्रीम कोर्टाने उपस्थित केलेले मुद्दे - येडीयूराप्पा यांना आमदारांचा तोंडी पाठिंबा लेखी नाहीच: अभिषेक मनु सिंघवी - बहुमत 24 तासांत सिद्ध करण्याचे आदेश देऊ शकतं - कोर्ट - येडियुरप्पांना उद्याच बहुमत सिद्ध करावं लागणार ? - बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया उद्याही होऊ शकते - कोर्ट - येडियुरप्पांच्या समर्थक आमदारांच्या नावांची पत्रात गरज नाही - रोहतगी - कोर्टाचा रोहतगींना सवाल, काँग्रेसनं नावांचं पत्र दिलंय, मग तसं पत्र तुम्ही का नाही सादर केलं. - काँग्रेस आणि जेडीएसची युती अभद्र - रोहतगी - कोर्टाचं निरीक्षण - हा आकड्यांचा खेळ आहे, आणि आकडे कुणाकडे आहेत ते पहायलाच पाहिजे. - बहुमत असेल तर सिद्ध करा - सुप्रीम कोर्ट - बहुमताचा फैसला विधानसभेतच होईल - सुप्रीम कोर्ट   पण दरम्यान, कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्याचे लोण आता गोवा, मणिपूर आणि बिहारमध्ये देखील पोहोचले आहेत. कारण जर कर्नाटकात स्पष्ट बहुमत नसताना फक्त मोठा पक्ष म्हणून भाजप सत्ता स्थापन करू शकतं, तर हाच नियम गोवा, मणिपूर आणि बिहारमध्ये का नको असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय. त्यामुळे कर्नाटकी नाट्याचा पुढचा अंक गोवा, बिहार आणि मणिपूरमध्ये सुरू झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही. कित्येक महिन्यानंतर या तीनही राज्यांमध्ये विरोधकांनी संख्याबळाचा डाव नव्यानं मांडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे आता कर्नाटकतं राजकारण तर पेटलंच आहे, पण त्याने गोवा, बिहार आणि मणिपूरमधलंही राजकारण पेटणार हे नक्की. पण या कर्नाटक निवडणुकांमुळे अनेक राजकीय डावपेच सगळ्यांसमोर आले.
corona virus btn
corona virus btn
Loading