महाराष्ट्राच्या शेजारी राज्यात जनजीवन सर्वात आधी येणार पूर्वपदावर; 17 तारखेपासून परीक्षा, जिम होणार सुरू

महाराष्ट्राच्या शेजारी राज्यात जनजीवन सर्वात आधी येणार पूर्वपदावर; 17 तारखेपासून परीक्षा, जिम होणार सुरू

येत्या 17 मेला लॉकडाऊन 3 संपल्यानंतर तिथे अनेक दैनंदिन व्यवहार सुरळीत होण्याच्या मार्गावर आहेत.

  • Share this:

बंगळुरू, 13 मे : येत्या 17 मेला लॉकडाऊन 3 संपल्यानंतर अनेक दैनंदिन व्यवहार सुरळीत होण्याच्या मार्गावर आहेत. जिम, क्लब तसंच प्रवेश परीक्षा आणि अॅडमिशनचा मार्गही तिथे मोकळा होऊ शकतो. महाराष्ट्रात अद्यापही कोरोनाव्हायरस (Coronavirus) चे रुग्ण कमी झालेले नाहीत. पण शेजारी कर्नाटक राज्यात मात्र कोरोनाचा आलेख कमी होत आहे. येत्या 17 मेपासून काही व्यवहार पूर्वपदावर आणण्याचा तिथलं राज्य सरकार प्रयत्न करणार आहे.

17 तारखेपासून कर्नाटकात गोल्फ क्लब, जिम सुरू होणार आहेत. तसंच इंजिनिअरिंग प्रवेशपरीक्षाही जाहीर करण्यात येईल. सोशल डिस्टन्सिंगचे नियम त्यांना अर्थातच पाळावे लागतील आणि कदाचित मास्क वापरणंही बंधनकारक असेल. पण व्यवहार सुरू होतील. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स सुरू करण्याचाही कर्नाटकात विचार सुरू आहे. पण केंद्र सरकारचे या संदर्भातले नियम जाहीर झाल्यानंतरच याविषयी घोषणा करण्यात येईल, असं कर्नाटकच्या सरकारी सूत्रांनी सांगितलं.

महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीसाठी अनिल देशमुखांची मोदी सरकारकडे मोठी मागणी

देशव्यापी लॉकडाऊन 17 तारखेला संपतो आहे. त्यानंतर देशात सार्वजनिक वाहतूक आणि व्यवहार पूर्वस्थितीत लगेच येऊ शकणार नाहीत. त्यामुळे लॉकडाऊन 4.0 अनिवार्य आहे. पण हा चौथा लॉकडाऊन वेगळा असेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच जाहीर केलं.

या Lockdown 4.0 चे नियम, निर्बंध आणि अटी जाहीर झाल्यानंतर कर्नाटकात इतर व्यवहार, रेस्टॉरंट्स, शाळा सुरू करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल.

अन्य बातम्या

कोरोनाच्या परिस्थितीत तुमचा फर्स्ट एड बॉक्स तयार आहे ना?

Lockdown मध्ये कपालभाती करणारी ही खार झाली स्टार, पाहा VIDEO

First published: May 13, 2020, 3:52 PM IST

ताज्या बातम्या