मराठी बातम्या /बातम्या /देश /

1700 कोटींची संपत्ती असलेला कोण आहे 'हा' काँग्रेसचा उमेदवार

1700 कोटींची संपत्ती असलेला कोण आहे 'हा' काँग्रेसचा उमेदवार

दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एक हजार कोटींहून अधिक संपत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एक हजार कोटींहून अधिक संपत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एक हजार कोटींहून अधिक संपत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

  • Published by:  Pooja Vichare

बंगळुरु, 25 नोव्हेंबर: काँग्रेसचे युसूफ शरीफ (Yusf Sharif) यांना पक्षात किंवा पक्षाबाहेरील फार कमी लोक ओळखतात. मात्र 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानपरिषद निवडणुकीसाठी (Karnataka Legislative Council Polls)युसूफ शरीफ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शरीफ यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एक हजार कोटींहून अधिक संपत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

रिअल इस्टेटमध्ये सामील होण्यापूर्वी भंगाराचा व्यवसाय करणाऱ्या शरीफ यांनी प्रतिज्ञापत्रात स्वत: आणि कुटुंबासह 1,744 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. 'गुजारी बाबू' किंवा 'स्क्रॅप बाबू' म्हणून प्रसिद्ध असलेले 54 वर्षीय शरीफ बंगळुरू अर्बनमधून निवडणूक लढवत आहेत. ते कोलार गोल्ड फिल्ड्सचा रहिवासी आहे आणि शरीफ यांनी शपथपत्रात म्हटले आहे की, त्यांनी सरकारी शाळेत पाचवीपर्यंत शिक्षण घेतलं असून त्यांना दोन पत्नी आणि पाच मुले आहेत.

हेही वाचा- भरधाव ट्रकची दोन विद्यार्थिनींसह दुकानदाराला धडक, घटनेचा Live Video

त्यांनी त्यांच्या नावावर 97.98 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 1,643.59 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जाहीर केली आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीकडे 98.96 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आणि 1.30 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, तर दुसऱ्या पत्नीकडे 32.22 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. बाकीची संपत्ती त्यांच्या मुलांच्या नावावर आहेत. त्यांच्यावर 67.24 कोटी रुपयांची देणी आहे.

रियल एस्टेट में आने से पहले स्क्रैप का व्यवसाय करने वाले शरीफ ने हलफनामे में अपने और अपने परिवार के पास 1,744 करोड़ रुपये की संपत्ति होने की घोषणा की है.

त्यांच्याकडे 16.87 कोटी रुपये विभक्त बँक खात्यांमध्ये आणि 17.61 कोटी रुपये बॉन्ड, डिबेंचर्स किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक म्हणून आहेत. त्यांच्या पत्नींच्या बँक खात्यांमध्ये अनुक्रमे 16.99 लाख आणि 20,681 रुपये आणि 1.60 लाख आणि 75,000 रुपयांची गुंतवणूक आहे.

हेही वाचा- Breaking News: शक्ती मिल गँगरेप प्रकरणातील आरोपींची फाशी रद्द

कुटुंबाकडे 3 कोटींहून अधिक किंमतीची वाहने आहेत ज्यात एक रोल्स रॉयस कार आणि दोन फॉर्च्युनर आणि 3.85 कोटी रुपयांचे दागिने, सराफा किंवा मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.

First published:

Tags: Karnataka, काँग्रेस