आईसाठी लेकानं नोकरी सोडली; तीर्थयात्रेसाठी स्कूटरवरुन केला 56, 522 KM प्रवास

आईसाठी लेकानं नोकरी सोडली; तीर्थयात्रेसाठी स्कूटरवरुन केला 56, 522 KM प्रवास

श्रावणबाळ! नोकरी सोडून आईला घेऊन गेला तीर्थयात्रेला, स्कूरवरून केला 56, 522 KM प्रवास

  • Share this:

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : कवड घेऊन जाणाऱ्या आणि आई-वडिलांसाठी जगणाऱ्या श्रावणबाळाची कथा सर्वांनाच माहीत आहे. या कथेतला श्रावणबाळ प्रत्यक्षात पाहायला मिळाला आहे. आपल्या आईसाठी मुलानं हजारो रुपयांची हातची नोकरी सोडली आणि आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्याचा निश्चय त्यानं केला. वडिलांच्या निधनानंतर तो आपल्या आईला घेऊन तीर्थयात्रेला निघाला. पण तीर्थयात्रा सरकारी किंवा खासगी गाडीनं नाही तर आपल्या वडिलांनी दिलेल्या दुचाकीवरून केली.

मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातील म्हैसूर इथे राहणाऱ्या कृष्णा कुमार यांनी आपल्या 70 वर्षाय आईला आपल्या स्कूटरवरून तीर्थयात्रा करण्यासाठी नोकरी सोडली. वडिलांची आठवण असलेली स्कूटर, कृष्णा आणि त्याची आई असा प्रवास सुरू झाला. 56 हजारहून अधिक किलोमीटरचा प्रवास माय-लेकानं स्कूटरवरून केला.

बंगळुरू मिररने दिलेल्या वृत्तानुसार कृष्णाला ही स्कूटर त्याच्या वडिलांनी 2001 रोजी घेऊन दिली होती. त्यानंतर 2015 साली वडिलांच्या निधनानंतर त्यांची आठवण ही स्कूटर होती. या स्कूटरवरून आई-मुलानं प्रवास केला. या प्रवासादरम्यान ते कोणत्याही हॉटेलमध्ये नाही तर मठ, धर्मशाळा किंवा मंदिरांमध्ये राहिल्याचंही कृष्णा यांनी सांगितलं.

हे वाचा-या योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख

संपूर्ण प्रवासात मला कोणतीच समस्या जाणवली नाही. माझ्या मुलानं मला खूप जपलं आणि उत्तम काळजी घेतलं असं कृष्णाचा आई यांनी सांगितलं. त्यांना संपूर्ण प्रवास करण्यासाठी साधारण 2 वर्ष आणि 9 महिन्यांचा कालावधी लागला.

कृष्णा बंगळुरूमधील एका खासगी कंपनीमध्ये काम करत होते. आईला तीर्थयात्रेला घेऊन जाण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली आणि दुचाकीवरून घेऊन गेले. 16 जानेवारी 2018 रोजी त्यांनी आपला प्रवास सुरू केला. त्यांना कोरोना आणि लॉकडाऊनदरम्यान अनेक समस्यांचा सामना देखील करावा लागला. 3 वर्षांत कृष्णा यांनी 56 हजारहून अधिक किमी प्रवास केला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 19, 2020, 12:56 PM IST
Tags: karnatka

ताज्या बातम्या