मराठी बातम्या /बातम्या /देश /

Karnataka Hijab Row: आता पगडी घालून येणाऱ्या शीख मुलीला कर्नाटकातील कॉलेजने रोखलं, 'हिजाब' वादाला वेगळं वळण

Karnataka Hijab Row: आता पगडी घालून येणाऱ्या शीख मुलीला कर्नाटकातील कॉलेजने रोखलं, 'हिजाब' वादाला वेगळं वळण

कर्नाटकमध्ये (Karnataka Hijab Row) वर्गात हिजाब (Hijab) घालून येण्यास मनाई करण्यात आल्यानं सुरू झालेल्या वादानं देशभरात गदारोळ माजलेला असतानाच कर्नाटकातील एका कॉलेजनं शीख मुलीला (Sikh Girl) पगडी (Turban) काढण्याची सक्ती केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

कर्नाटकमध्ये (Karnataka Hijab Row) वर्गात हिजाब (Hijab) घालून येण्यास मनाई करण्यात आल्यानं सुरू झालेल्या वादानं देशभरात गदारोळ माजलेला असतानाच कर्नाटकातील एका कॉलेजनं शीख मुलीला (Sikh Girl) पगडी (Turban) काढण्याची सक्ती केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

कर्नाटकमध्ये (Karnataka Hijab Row) वर्गात हिजाब (Hijab) घालून येण्यास मनाई करण्यात आल्यानं सुरू झालेल्या वादानं देशभरात गदारोळ माजलेला असतानाच कर्नाटकातील एका कॉलेजनं शीख मुलीला (Sikh Girl) पगडी (Turban) काढण्याची सक्ती केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

पुढे वाचा ...

बेंगळुरू, 24 फेब्रुवारी: कर्नाटकमध्ये (Karnataka Hijab Row) वर्गात हिजाब (Hijab) घालून येण्यास मनाई करण्यात आल्यानं सुरू झालेल्या वादानं देशभरात गदारोळ माजलेला असतानाच कर्नाटकातील एका कॉलेजनं शीख मुलीला (Sikh Girl) पगडी (Turban) काढण्याची सक्ती केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. देशातील पाच राज्यांच्या निवडणुका होत असल्याने हिजाबचा मुद्दा खूप चर्चेत आला होता. आता या नव्या प्रकरणामुळे वातावरण अजून तणावपूर्ण व्हायची शक्यता आहे.

मुस्लिम विद्यार्थिनींनी वर्गात हिजाब घालण्याच्या हक्काच्या संरक्षणासाठी दाखल केलेल्या याचिकांवर कर्नाटक उच्च न्यायालयात (Karnataka High Court) सुनावणी सुरू असतानाच बेंगळुरूमधील वसंत नगर भागातील प्रसिद्ध माऊंट कार्मेल (Mount Carmel College) कॉलेजने एका 17 वर्षीय अमृतधारी (Amritdhari) (अनुग्रहित) शीख विद्यार्थीनीला (Sikh Girl Student) तिची पगडी काढण्याचा आदेश दिल्यानं एकच गदारोळ माजला आहे. मात्र युनिफॉर्म कोड (Uniform Code) आणि उच्च न्यायालयाचा आदेश (High Court's Interim Order) यानुसारच ही सूचना केल्याचा दावा कॉलेजनं केला आहे. कर्नाटकातल्या या प्रकाराबद्दल द क्विंटने वृत्त दिलं आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयानं 10 फेब्रुवारी रोजी दिलेल्या अंतरिम आदेशात विद्यार्थ्यांनी वर्गात भगवी शाल, हिजाब तसंच कोणतेही धार्मिक ध्वज किंवा इतर गोष्टी परिधान करू नयेत,असे स्पष्ट केले आहे.

हे वाचा-...अन् 'गंगा'ने घडवला इतिहास! महापालिका निवडणुकीत ट्रान्सजेंडर महिलेचा विजय

या घटनेने आपल्या कुटुंबाला मोठा धक्का बसल्याचं या मुलीचे वडील गुरचरणसिंग यांनी म्हटलं आहे. गेल्या 17 वर्षांपासून ते बंगळुरूमध्ये राहत असून, आयटी व्यावसायिक म्हणून काम करत आहेत. तर उच्च न्यायालयाच्या आदेशाला आपण बांधील असून, कधीही कोणावरही जबरदस्ती केली नाही किंवा कोणालाही वर्गाबाहेर पाठवलं नसल्याचं कॉलेजनं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, गुरचरणसिंग यांनी बंगळुरूच्या उलसूर इथल्या श्री गुरुसिंग सभेच्या प्रशासनाला पत्र लिहीलं आहे. 'आपली मुलगी, अमितेश्वर कौर हिला तिच्या कॉलेजच्या व्यवस्थापनानं तिनं तिची दास्तार अर्थात पगडी काढून कॉलेजात यावं असा आदेश दिला. यावर तिनं ती अमृतधारी शीख असल्याचं सांगत या गोष्टीला नम्रपणे नकार दिला, असं त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

या मुद्द्यावर कर्नाटक सरकारने स्पष्टीकरण देण्याची गरज असल्याचंही सिंग यांनी म्हटलं आहे. कॉलेजमधील व्यवस्थापन अधिकारी मुस्लिम मुलींना त्यांचा हिजाब काढण्यासाठी सांगत होते. त्याचवेळी त्यांनी आपल्या मुलीला बाजूला बोलावून तिला तिची दस्तार (पगडी) काढण्यास सांगितलं. हा शीख व्यक्तीचा आणि संपूर्ण शीख समाजाचा मोठा अपमान आहे, 'दस्तार (पगडी) हा शिखांचा (पुरुष आणि महिला) आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, ज्याचा पाच कक्करांमध्ये समावेश आहे. शीखांचे दहावे गुरु गुरू गोविंदसिंगजी यांनी दिलेला आदेशानुसार, या गोष्टींना आम्ही आपल्या शरीराचाच एक भाग मानून नेहमी जवळ बाळगतो,' असंही सिंग यांनी पत्रात म्हटलं आहे.

हे वाचा-ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या 'हे' नियम; उल्लंघन केल्यास होईल शिक्षा

'आम्ही मुस्लिम मुली-महिलांच्या पाठीशी उभे आहोत ज्यांना त्यांच्या श्रद्धेचा भाग म्हणून स्कार्फ किंवा दुपट्ट्याने डोके झाकायचे आहे. आम्ही अधिकार्‍यांना विनंती करतो की त्यांनी यासाठी परवानगी द्यावी कारण ती आपल्या देशात पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे. इतर लोकांना त्रास देण्याचा यात कोणताही उद्देश नाही,' असंही गुरचरणसिंग यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, कॉलेज प्रशासनाने TOI ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, 'आम्हाला आतापर्यंत या मुलीने पगडी घातल्याने कोणतीही अडचण नव्हती. जेव्हा 16 फेब्रुवारी रोजी कॉलेज पुन्हा सुरू झाले, तेव्हा आम्ही सर्व विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती दिली आणि आम्ही नेहमीप्रमाणे कामकाज सुरू केलं.

मंगळवारी, प्री-युनिव्हर्सिटी एज्युकेशनच्या उत्तर विभागाच्या (Pre University Education (North)) उपसंचालकांनी कॉलेजला भेट दिली तेव्हा त्यांना हिजाब घातलेल्या मुलींचा एक गट दिसला. तेव्हा त्यांनी या मुलींना ऑफिसात येण्यास सांगितलं आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती दिली. त्यानंतर या मुलींनी मागणी केली की कोणत्याही मुलीला धार्मिक चिन्हे (Religious Signs) घालण्याची परवानगी देऊ नये आणि त्यामुळे शीख मुलीलाही पगडी घालण्याची परवानगी देऊ नये. तेव्हा आम्ही या मुलीच्या वडिलांशी बोललो आणि नंतर त्यांना ई-मेल केला. त्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती दिली आणि त्याचे पालन करण्यास सांगितले,' असं कॉलेज प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

'या मुलीच्या वडिलांना लिहिलेल्या आमच्या पत्रात, आम्ही हे स्पष्टपणे नमूद केलं आहे की आम्ही सर्वसमावेशक समाजावर विश्वास ठेवतो आणि सर्व धार्मिक प्रथांचा आदर करतो. महाविद्यालयाच्या ध्येयानुसार, आम्ही धार्मिक सौहार्द (Inter Religious Harmony) पाळतो आणि आमच्या कॉलेजमध्ये सर्व धर्मीयांमध्ये चांगले सहकार्य दिसून येते,' असंही कॉलेजनं म्हटलं आहे.

दरम्यान, प्री-युनिव्हर्सिटी एज्युकेशनचे उपसंचालक (उत्तर) जी. श्रीराम यांनी आता या कॉलेजमध्ये काही समस्या नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 'उच्च न्यायालयाच्या आदेशात पगडीबद्दल काहीही सांगितलेले नाही. आता आपण असे मुद्दे जास्त ताणू नयेत. आम्हाला फक्त उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करायचं आहे. जेव्हा मी कॉलेजच्या प्रिन्सिपलना याविषयी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, मुलींशी याबाबत चर्चा झाली असून, त्यांना कॉलेजचे म्हणणे पटले आहे. त्यामुळे आता कॉलेजमध्ये याविषयी कोणतीही समस्या नाही,' असे त्यांनी सांगितले आहे.

First published:

Tags: Bengaluru, Karnataka