Bengaluru Heavy Rain: बंगळुरूत पावसाचं धुमशान! गाडी-रस्तेच नाही तर देवही गेले पाण्यात, पाहा VIDEO

Bengaluru Heavy Rain: बंगळुरूत पावसाचं धुमशान! गाडी-रस्तेच नाही तर देवही गेले पाण्यात, पाहा VIDEO

दोनच दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने शुक्रवारी बेंगळुरूसह संपूर्ण कर्नाटकात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. आयएमडीने राज्यासाठी अलर्ट जारी केला.

  • Share this:

बंगळुरू, 24 ऑक्टोबर : कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये (Bengaluru) पावसानं धुमशान घातले आहे. मुसळधार पावसानं सर्वसामान्यांचं जीवन उद्ध्वस्त केले. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. बंगळुरूसह इतर शहरं पाण्याखाली गेली आहे. बंगळुरूमध्ये गाडी आणि रस्तेच नाही तर मंदिरंही पाण्याखाली गेलेली पाहायला मिळत आहेत. दोनच दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने शुक्रवारी बेंगळुरूसह संपूर्ण कर्नाटकात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. आयएमडीने राज्यासाठी अलर्ट जारी केला.

कर्नाटकातील चार पूरग्रस्त जिल्ह्यांचा हवाई सर्वेक्षण केल्यानंतर एक दिवसानंतर मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी गुरुवारी सांगितले की, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पूर परिस्थिती अधिक गंभीर होती आणि त्याबद्दल केंद्राला जागरूक केले गेले आहे. राज्य सचिवालयात मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाण्यापूर्वी मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते.

येडियुरप्पा म्हणाले की आम्ही केंद्राला याची जाणीव करून दिली असून बाधित लोकांना अधिक दिलासा देण्याची गरज आहे. मंत्रिमंडळात पूरग्रस्तांना अधिक दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. येडियुरप्पा यांनी बुधवारी विजापूर, कलबुर्गी, यादगीर आणि रायचूर या जिल्ह्यांचा हवाई सर्वेक्षण केला, जेथे भीमा नदीत गेल्या नऊ दिवसांपासून पूरस्थिती आहे. भारतीय सैन्य दल आणि राष्ट्रीय व राज्य आपत्ती निवारण दल या भागात बचावकार्यात व्यस्त आहे.

आतापर्यंत 4 पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये 247 ​​बाधित गावे ओळखली गेली आहेत. तर 136 गावातील 43 हजार 158 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने 205 मदत शिबिरे उघडली असून तेथे 37 हजार 931 लोकं राहत आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: October 24, 2020, 2:35 PM IST
Tags: rain flood

ताज्या बातम्या