कर्नाटकमध्ये राजकीय भूकंप तर मुंबईत नाट्य, बंडखोर आमदार 'सोफिटेल'मध्ये

राजीनामे स्वीकारले जात नाहीत तोपर्यंत सर्व बंडखोर आमदार मुंबईतच थांबणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. या सर्व बंडखोर आमदारांना भाजप संरक्षण देत असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय.

News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2019 10:50 PM IST

कर्नाटकमध्ये राजकीय भूकंप तर मुंबईत नाट्य, बंडखोर आमदार 'सोफिटेल'मध्ये

मुंबई 7 जुलै : कर्नाटकमधल्या राजकीय नाट्याचे मुंबईतही पडसाद उमटले आहेत. जेडीएस आणि काँग्रेसच्या ज्या आमदारांनी राजीनामे दिलेत ते सर्व आमदार मुंबईतल्या सोफिटेल हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. राजीनामे स्वीकारले जात नाहीत तोपर्यंत मुंबईतच थांबणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. या सर्व बंडखोर आमदारांना भाजप संरक्षण देत असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय. काँग्रेसचे नेते नसिम खान, एकनाथ गायकवाड आणि भाई जगताप यांनी सोफिटेल हॉटेलसमोर धरणंच धरलं होतं.

या सर्व आमदारांची भेट घेऊ देण्याची मागणी काँग्रेसच्या या नेत्यांनी केली होती मात्र त्यांना हॉटेलमध्ये जाऊ देण्यात आलं नाही. तर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना मात्र हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात आला असा आरोप नसिम खान यांनी केलाय.

दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी  तातडीने आज बंगळुरूत परतले. आल्यावर त्यांनी सर्व आमदारांची बैठक घेतली आणि डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू केला.

या एका नेत्यामुळे टळू शकेल कर्नाटकातील Congress – JDS सरकारवरील संकट

असं आहे महाराष्ट्र कनेक्शन

Loading...

कर्नाटकमधील काँग्रेस–जेडीएस सरकार पाडण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. राजीनामा दिलेल्या काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी पुन्हा घरवापसी करू नये, यासाठी त्यांना मुंबईत आणण्यात आलं आहे. या सगळ्याची जबाबदारी भाजपच्या नेतृत्वाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवल्याची माहिती आहे.

दरम्यान, भाजपच्या या हालचालींमुळे कर्नाटकमधील विद्यमान सरकारचं भवितव्य अधांतरी आहे. कारण, शनिवारी 14 आमदारांनी आपले राजीनामे दिले. त्यामुळे काँग्रेस – जेडीएस सरकार टिकणार की जाणार? यावर आता चर्चा सुरू झाली आहे. राजीनामा देणाऱ्या आमदारांमध्ये काँग्रेसचे 11 आणि जेडीएसच्या 3 आमदारांचा समावेश आहे.

कर्नाटकनंतर मध्य प्रदेशात देखील सरकार धोक्यात?

काँग्रेस–जेडीएस सरकारचं भवितव्य एका नेत्याच्या हातात आहे असून तो नेता म्हणजे रामलिंग रेड्डी. रामलिंग रेड्डी हे बंडखोर आमदारांचं नेतृत्व करत आहेत. रामलिंग रेड्डी यांची मनधरणी करण्यात काँग्रेसला यश आल्यास काँग्रेस – जेडीएस सरकारला कोणताही धोका नसणार आहे. त्यामुळे काँग्रेसनं आपली संपूर्ण ताकद आता रामलिंग रेड्डी यांची मनधरणी करण्यावर केंद्रीत केली आहे.

भाजपला सत्ता स्थापनेची संधी

कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेची हुकलेली संधी भाजपच्या जिव्हारी लागली आहे. विधानसभेच्या 224 जागांपैकी काँग्रेसकडे 78, जेडीएस 37, बसपा 1, अपक्ष 2, भाजप 105 आणि अन्य 1 अशी आकडेवारी आहे. दरम्यान, 11 आमदारांचा राजीनामा स्वीकार केल्यास सदस्यसंख्या 210 होईल. त्यामुळे बहुमताचा आकडा हा 113 ऐवजी 106 होईल. काँग्रेस – जेडीएसकडे 104 आमदार आहेत. त्यांना बहुमतासाठी 2 जागा कमी पडतील. तर, भाजपाकडे 105 जागा असल्यानं त्यांना केवळ 1 आमदाराची गरज आहे. त्यामुळे भाजपला सरकार स्थापनेची संधी या ठिकाणी सर्वाधिक आहे. पण, पुढील 3 दिवस हे कर्नाटकाच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2019 10:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...