बेंगलुरु, 07 जानेवारी : कर्नाटकच्या उत्पादन शुल्क विभागाने गरीब लोक कमी दर्जाची दारू पिण्यापासून रोखण्यासाठी काही दारूच्या ब्रँडवर अनुदान देण्याचा विचार करत आहे. राज्यातील नागरिकांचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी राज्य सरकार हे पाऊल उचलत आहे. याशिवाय सरकारकडून राज्यात बार आणि रेस्टॉरंट रात्री 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय़ घेतला जाऊ शकतो. काँग्रेस-जेडीएस आघाडीतून बाहेर पडून भाजपमध्ये आलेले अपक्ष आमदार एच नागेश यांच्याकडे महत्वाचे खाते मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी दिलं आहे. ते हा निर्णय घेण्याची शक्यता दिसत आहे.
एच नागेश यांनी एका पत्रकार परिषदेवेळी सांगितलं की, सरकार आणि उत्पादन शुल्क विभाग दारुच्या काही ब्रँडवर अनुदान देण्याचा विचार करत आहे. यामुळे गरीब लोकांना स्वस्तातली दारू प्यायला लागू नये. ही दारू चांगल्या ब्रँडच्या दारूच्या तुलनेत जास्त धोकादायक असते.
अनुदानाच्या किंमतीत सरकार चांगली गुणवत्ता असलेली दारू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही अशा दारूचे उत्पादन करू जी जास्त गरीब लोक पितात. ती कमी किंमतीत विकली जाते असंही नागेश म्हणाले.
वाचा : लेकीचं प्रेम आई-वडिलांना पाहावलं नाही, प्रियकराला विष पाजून संपवल्याचा आरोप
गृह विभाग रात्री येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करत आहे. सरकारने बार आणि रेस्टॉरंट बंद करण्याची वेळही वाढवली आहे. सध्ये रात्री 11 वाजता रेस्टॉरंट आणि बार बंद होतात. पण विकेंडला रात्री 1 वाजेपर्यंत सुरू असतात. मी आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत गृह विभागाशी चर्चा केली आहे. त्यांचीही या प्रस्तावाला सहमती आहे असे एच नागेश यांनी सांगितलं.
वाचा : बायकोला इंप्रेस करण्यासाठी नवऱ्याने पहिल्यांदाच केली चोरी आणि...! मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.