बंगळुरू, 08 सप्टेंबर : एकीकडे देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. अशा सगळ्या कठिण परिस्थिती कर्नाटकात मात्र एका वरिष्ठ डॉक्टरांवर रिक्षा चालवण्याची वेळ आली आहे. या अवस्थेसाठी डॉक्टरांनी आयएएस अधिकारी आणि सरकारी अधिकारी यांना जबाबदार धरले आहे.
बेल्लारीच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागात 24 वर्षे सेवा बजावणारे 53 वर्षीय डॉक्टर रवींद्रनाथ एम.एच. आता दावणगिरी शहरात रिक्षा चालवत आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या या अवस्थेसाठी आयएएस अधिकाऱ्यांना दोष देत सांगितले की, एका अधिकाऱ्याने पोस्टिंगमध्ये मदत करण्यास नकार दिल्यानंतर 2018 मध्ये त्यांचा छळ करण्यास सुरुवात केली.
वाचा-जालना पोलीस दल हादरले, मुख्यालयातच एपीआयने गोळी झाडून केली आत्महत्या
गेल्या वर्षी जूनपासून निलंबित
ग्रामीण भागात 17 वर्षे काम करणाऱ्या या डॉक्टरांना सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणाली सुधारण्यासाठी पुरस्कारही देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्याच्या एका सीईओने पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे शोषण सुरू केल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आरोग्य कर्मचार्यांच्या आउटसोर्सिंगमध्ये तांत्रिक समस्या दर्शविल्यानंतर गेल्या वर्षी 6 जून रोजी रवींद्रनाथ यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी कर्नाटक प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (KAT) अपील केले, त्यानंतर सरकारकडून त्यांच्या पुर्ननियुक्तीचे आदेश आले.
वाचा-माशीला मारायला गेला अन् घरात झाला स्फोट, तुम्हीही ही चूक करत असाल तर सावधान!
पदोन्नती करूनही 15 महिन्यांचा पगार नाही
डॉ. रवींद्रनाथ म्हणाले की, 'पोस्टिंग करताना त्यांनी जाणीवपूर्वक तालुक्याला पाठवले. पुन्हा एकदा केस केएटीकडे गेली आणि तिथून मला जिल्हास्तरावर नियुक्ती करण्याची सूचना देण्यात आली. आदेश असूनही, मी अद्याप पोस्टिंगच्या प्रतीक्षेत आहे. ते म्हणाले की 15 महिन्यांपासून त्यांना पगारही मिळालेला नाही. अपजीविकेसाठी अखेर त्यांना कर्ज घेऊन रिक्षा घ्यावी लागली.