Night curfew हटवला! विरोधकांच्या टीकेनंतर अखेर या राज्याने घेतला यूटर्न

खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात ठाकरे सरकारने रात्रीची संचारबंदी (Night Curfew)लागू केली आहे. पण शेजारी राज्याने हा बंदी आदेश Christmas eve लाच मागे घेतला.

खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात ठाकरे सरकारने रात्रीची संचारबंदी (Night Curfew)लागू केली आहे. पण शेजारी राज्याने हा बंदी आदेश Christmas eve लाच मागे घेतला.

  • Share this:
    बंगळुरू, 24 डिसेंबर : Coronavirus च्या नव्या रूपामुळे (New strain of coronavirus in UK) जग हादरलं असताना खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात ठाकरे सरकारने रात्रीची संचारबंदी (Night Curfew)लागू केली. आणखीही काही राज्यांनी याच निर्णयाची री ओढली. पण त्यातल्या कर्नाटकने आता माघार घेत हा निर्णय फिरवला आहे. ख्रिसमसच्या आधीच (Christmus Eve)त्यांनी नाइट कर्फ्यू मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात Covid-19 चा प्रसार आटोक्यात आला असं वाटत असतानाच उद्धव ठाकरे यांनी रात्रीची संचारबंदी लागू केली. रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत नागरिकांच्या बाहेर पडण्यावर बंधनं आली. त्यामुळे नवीन वर्षाच्या पार्टीचे आणि ख्रिसमस सेलिब्रेशनचे प्लॅनही आटोपते घ्यावे लागले आहेत. पण महाराष्ट्रापाठोपाठ शेजारच्या भाजपशासित कर्नाटक राज्यानेही night curfew लागू केला. त्या राज्यात या निर्णयावर मजबूत टीका झाली. अखेर ख्रिसमसच्या आदल्या दिवशी संध्याकाळी कर्नाटक सरकारने हा निर्णय मागे घेत नाताळच्या प्रार्थनेला (Midnight mass)रात्री परवानगी दिली. एवढंच नाही तर नाइट कर्फ्यूचा निर्णयही मागे घेतला. 'राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीने परिस्थितीचा आढावा घेऊन आत्ता कर्फ्यूची गरज नसल्याचं सांगितल्याने तो आदेश मागे घेत आहोत', असं कर्नाटकच्या मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आलं. 'मुंबईकरांनो, नाईट कर्फ्यूमध्येही तुम्ही रस्त्यावर फिरू शकता मुंबईत रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. पण या निर्णयानंतर आम्ही रात्री घराबाहेर पडायचं की नाही, याबाबत अनेक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या नाईट कर्फ्यूमधून सुट देण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस दलाचे कायदा सुव्यवस्थेचे पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे. मात्र हॉटेल, पब, बार, रेस्टॉरंट तसंच करमणूक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ही सुट लागू होणार नाही, असंही ते म्हणाले. रात्रीही तुम्ही रस्त्यावर फिरू शकता, पण... नाईट कर्फ्यूमध्ये तुम्ही टू व्हिलरने फिरु शकता, पायी फिरु शकता, तसंच चारचाकी गाडीनेही देखील घराबाहेर पडू शकता. मात्र गाडीत चारपेक्षा जास्त जण नसतील याची खबरदारी घ्यावी. कारण हा कर्फ्यू मुंबईकरांच्या सुरक्षिततेकरता असून सुरक्षेपायी हा कर्फ्यू लावण्यात आल्याची माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे. ख्रिसमस सण साजरा करण्याबाबत महत्त्वपूर्ण आदेश दरम्यान, ख्रिसमस सण साजरा करण्याबाबतही राज्य सरकारने महत्त्वपूर्ण आदेश काढले आहेत. यंदा ख्रिसमस सण साध्या पद्धतीने साजरा करतानाच चर्चमध्ये 50 पेक्षा जास्त लोक प्रार्थना सभेला उपस्थित राहू नये, तसंच चर्चमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही, सामाजिक सुरक्षिततेचे अंतर नियमावली काटेकोर पद्धतीने पाळली जावी असे आदेश दिले आहेत.
    First published: