Karnataka LIVE: कुमारस्वामी सरकार कोसळले; भाजपचे ऑपरेशन लोटस यशस्वी!

Karnataka LIVE: कुमारस्वामी सरकार कोसळले; भाजपचे ऑपरेशन लोटस यशस्वी!

विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीत राज्यातील एच.डी.कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारचा पराभव झाला.

  • Share this:

बेंगळूरू, 23 जुलै:गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकातील राजकीय नाटकावर अखेर पडदा पडला. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीत राज्यातील एच.डी.कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारचा पराभव झाला. अनेक दिवसापासून सुरु झालेल्या बहुमत चाचणीवर अनेक वादानंतर आज (मंगळवारी) मतदान झाले. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. या ठरावात सरकारचा 99 विरुद्ध 105 मतांनी पराभव झाला.

बहुमत चाचणीत सरकारच्या बाजूने 99 मते तर भाजपच्या बाजूने 105 मते मिळाली. राज्यात 16 आमदारांनी बंडखोरी करत राजीनामा दिला होता. तेव्हापासून राज्य सरकार अस्थिर झाले होते. राज्यातील राजकीय नाट्याचा अंक सर्वोच्च न्यायालयात देखील गेला होता. गेल्या 3 दिवसापासून विधानसभेतील चर्चा, वादानंतर आज विधानसभेचे अध्यक्ष रमेश कुमार यांनी देखील आज बहुमत चाचणी झाली नाही तर आपण देखील राजीनामा देऊ असे म्हटले होते.

संपूर्ण देशाचे लक्ष आलेल्या कर्नाटकातील राजकीय नाट्य 21 दिवसानंतर संपले. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीत कुमारस्वामी यांचा पराभव झाला. गेल्या 3 दिवसांपासून बहुमत चाचणीपासून दूर जाणारे जेडीएस-काँग्रेस सरकारला अखेर पराभवाचा सामना करावा लागला. बहुमत चाचणीसाठी बोलवण्यात आलेल्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधीपक्षांच्या आमदारांमध्ये अनेकदा वाद झाले. पहिल्या दिवशी तर भाजपचे नेते येडियुरप्पा सभागृहातच झोपले होते.

दरम्यान बहुमत चाचणी सिद्ध न करता आल्याने मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे.

बारामतीत देशी दारूच्या दुकानाबाहेर दारुड्यांची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल

Published by: Akshay Shitole
First published: July 23, 2019, 7:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading