Home /News /national /

कमाल! दोन्ही हात वापरून मिनिटाला 45 शब्द लिहते ही मुलगी, वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली नोंद

कमाल! दोन्ही हात वापरून मिनिटाला 45 शब्द लिहते ही मुलगी, वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली नोंद

कर्नाटकमधील एक 16 वर्षीय मुलगी तिच्या अंगी असणाऱ्या एका विशेष गुणामुळे चर्चेत आली आहे. ही मुलगी आपल्या दोन्ही हाताने लिहिण्याच्या स्टाइलमुळे चर्चेत आहे.

    कर्नाटक, 17 सप्टेंबर : जगभरात अनेक लोकांकडे विशेष कला असतात. यामधील काही लोकांच्या कलांमुळे त्यांच्या नावाची नोंद वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील होत असते. कर्नाटकमधील अशीच एक 16 वर्षीय मुलगी तिच्या अंगी असणाऱ्या एका विशेष गुणामुळे चर्चेत आली आहे. ही मुलगी आपल्या दोन्ही हाताने लिहिण्याच्या स्टाइलमुळे चर्चेत आहे. आदी स्वरूपा नावाच्या या मुलीच्या या कलेमुळे तिचे नाव आतापर्यंत दोन वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील तिचे नाव नोंदवले गेले आहे. सध्या स्वरूपा तिच्या या अनोख्या सवयीच्या आणि कलेच्या बळावर मिनिटाला 45 शब्द लिहू शकत असून इंग्लिश आणि कन्नड या दोन भाषांमध्ये ती लिहू शकतो.  या वर्ल्ड रेक़ॉर्ड  बरोबरच मिमिक्री, रुबिक क्यूब आणि संगीतामध्ये देखील वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा तिचा मानस आहे. आयएएनएसला तिने अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर तिला सध्याच्या 45 शब्द प्रति मिनिट हा रेकॉर्ड 60 शब्द प्रति मिनिटांपर्यंत पोहोचवायचा आहे. स्वरूपा इतर विद्यार्थ्यांप्रमाणे रेग्यूलर शाळेमध्ये जात नाही, मात्र घरूनच ती दहावीच्या परीक्षेची तयारी करते आहे. तिचे आई वडील देखील तिला विविध गोष्टी करण्यासाठी प्रेरणा देत असतात. अवघ्या  2 ते 3 वर्षांची असताना तिने दोन्ही हातांनी लिहण्यास सुरुवात केली होती. (हे वाचा-'उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न स्टार', कंगना रणौतने उधळली मुक्ताफळं) आपल्या आईच्या मदतीने तिने रुबिक क्यूब स्पर्धेमध्ये देखील वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता. त्याचबरोबर तिला कमीतकमी 10 वर्ल्ड रेकॉर्ड बनवायचे आहेत. एवढेच नव्हे तर तिला बिटबॉक्सिंगमध्ये देखील वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आहे. सध्या ती गिटार शिकण्याचा प्रयत्न करत आहे.  तिच्या टॅलेंट आणि कलेविषयी बोलताना तिचे वडील म्हणतात की, ती 18 महिन्यांची असतानाच वाचायला शिकली होती तर 30 महिन्यांची असताना लिहायला शिकली होती. त्यामुळे तिच्यामध्ये जन्मतःच हे गुण  होते. आम्ही केवळ त्यांना वाव देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर सध्या ती इतर गोष्टी शिकण्याबरोबरच हिंदुस्थानी संगीत देखील शिकत आहे.  नुकताच तिचा उत्तर प्रदेशमधील लता फाउंडेशनकडून एक्सक्लूझिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड याअंतर्गत गौरव करण्यात आला होता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या