क्रूरतेचा कळस, विद्यार्थिनीला जिवंत जाळून झाडाला टांगले

क्रूरतेचा कळस, विद्यार्थिनीला जिवंत जाळून झाडाला टांगले

अर्धवट जळालेला मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ, घटनास्थळी सापडली सुसाइड नोट

  • Share this:

रायचूर, 20 एप्रिल : कर्नाटकात क्रूरतेचा कळस गाठणारी घटना घडली आहे. रायचूर जिल्ह्यातील एका इंजिनियरिंगच्या विद्यार्थीनीला पहिल्यांदा जिवंत जाळण्यात आलं. त्यानंतर तिला झाडाला टांगल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला आहे. या तरुणीजवळ चक्क सुसाइड नोट सापडली आहे. मात्र, पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 एप्रिलला मधु नावाच्या इंजिनियरिंगच्या विद्यार्थिनीचा अर्धवट जळालेला मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत मिळाला होता. तिच्याजवळ सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये परिक्षेत अपेक्षेप्रमाणे यश मिळण्याची शक्यता नसल्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे. मात्र, मृतदेहाची अवस्था पाहता ही आत्महत्या नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून एका तरुणाला ताब्यात घेतल्याचे समजते. पोलिसांनी घटनास्थळ किंवा संशयित तरुणाचा फोटोसुद्धा अद्याप प्रसिद्ध केलेला नाही.

दरम्यान, विद्यार्थिनीचा खून करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप काहींनी केला आहे. या प्रकरणाची सोशल मीडियावरही बरीच चर्चा सुरू आहे. विद्यार्थिनीचा नाहक बळी गेला असून तिला न्याय मिळावा अशी मागणी लोकांमधून होत आहे. रायचूरचे एसपी किशोर बाबूंनी सांगितले की, या प्रकरणी पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. एका तरुणाला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू आहे.

First published: April 20, 2019, 9:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading