मराठी बातम्या /बातम्या /देश /Karnataka Elections : भाजपचा प्लॅन आला समोर; 'या' नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी!

Karnataka Elections : भाजपचा प्लॅन आला समोर; 'या' नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी!

कर्नाटक भाजपमध्ये बंडखोरी

कर्नाटक भाजपमध्ये बंडखोरी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं असून, भाजप नेते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

दिल्ली, 31 मार्च : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. राज्यातील निवडणुकीसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. दहा मे रोजी मतदान होणार आहे, तर 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी 20 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. दरम्यान कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच भाजपकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. पुन्हा एकदा राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप नेत्यांनी कंबर कसली आहे.

     प्रत्येक मतदारसंघात 75 कार्यकर्ते  

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होताच राजकारणही तापलं आहे. कर्नाटकात पुन्हा सत्ता आणण्यासाठी भाजप आपली पूर्ण ताकद पणाला लावणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कर्नाटक निवडणुकीच्या मैदानात भाजपच्या केंद्रीय नेत्यांशिवाय 17 हजारांहून अधिक कार्यकर्त्यांची फौज उतरवणार आहे. राज्याच्या सर्व सहा विभागांत पक्ष पदाधिकारी हजर राहून जनसंपर्क व इतर जबाबदाऱ्या पार पाडणार आहेत. राज्यात एकूण 224 विधानसभेच्या जागा आहेत. प्रत्येक मतदारसंघात भाजपचे 75 कार्यकर्ते निवडणूक प्रचार संपेपर्यंत तळ ठोकणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार? जयंत पाटलांच्या 'त्या' वक्तव्यानं चर्चेला उधाण

सध्याचे पक्षीय बलाबल 

कर्नाटक विधानसभेत एकूण 224 जागा आहेत. सध्या भाजपचे 117 आमदार आहेत. तर काँग्रेसचे 69 आणि त्यांचा सहकारी पक्ष जदयूचे 32 आमदार आहेत. कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी संपुष्टात येणार आहे. कर्नाटकात 2018 मध्ये 27 मार्च रोजी विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली होती. त्या निवडणुकीत भाजपने 104 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने 80 आणि जदयूने 37 जागांवर बाजी मारली होती.

स्वतः शेणात बरबटलेले अन् दुसऱ्यावर शेण्या..; करमुसे प्रकरणावरून शिवसेनेनं पुन्हा आव्हाडांना डिवचलं

निवडणुकीत चूरस 

यंदाची निवडणूक ही अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. 'आप' देखील या निवडणुकीत आपलं नशीब आजमवण्याची शक्यता आहे. तसंच राष्ट्रवादी देखील आपले उमेदवार निवडणुकीत उभे करण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप राष्ट्रवादीकडून कर्नाटक निवडणुकीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

First published:
top videos

    Tags: BJP, Election, Karnataka Election