Elec-widget

कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध, 'हे' आहेत महत्त्वाचे मुद्दे

कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध, 'हे' आहेत महत्त्वाचे मुद्दे

काँग्रेसने एकूण 4 जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. हे जाहीरनामे प्रत्येक ब्लॉक्स, जिल्हे आणि कम्युनिटीला लक्षात ठेऊन तयार करण्यात आले आहे.

  • Share this:

27 एप्रिल : कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. कर्नाटकमध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. यात काँग्रेसने एकूण 4 जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. हे जाहीरनामे प्रत्येक ब्लॉक्स, जिल्हे आणि कम्युनिटीला लक्षात ठेऊन तयार करण्यात आले आहे. 'प्रत्येक राज्यातील लोकांपर्यंत पोहचून आम्ही त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा जाणून घेतल्या आणि त्यानुसारचं जाहीरनामे तयार करण्यात आले' असल्याचं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.

'या जाहीरनाम्यात लिहलेल्या प्रत्येक गोष्टी आम्ही करून दाखवणार. मागच्या जाहीरनाम्यातली 95 टक्के कामं आम्ही करून दाखवली आहेत' असं म्हणत राहुल गांधी यांनी जनतेला विश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे.

'तुम्ही पाहिलं असेल भाजपचा जाहीरनामा हा 3-4 लोकांना सोबत घेऊन बनवला जातो. त्यांच्या जाहीरनाम्यात भ्रष्टाचार, रेड्डी ब्रदर्सच्य संकल्पना असतात. भाजपचा जाहीरनामा म्हणजे आरएसएसचा जाहीरनामा असतो', असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाना साधला आहे.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे

- मुलींसाठी मोफत पदव्युत्तर शिक्षण

Loading...

- शहरी भागात स्वस्त घरं बांधण्यासाठी समिती

- शहरांतील झोपडपट्ट्यांचा विकास करण्यासाठी समिती

- वाहतूक व्यवस्थेत सुधारणा

- अल्पसंख्यकांचा सामाजिक आणि आर्थिक दर्जा वाढवणार

- प्रत्येक घराला पिण्याचं पाणी पुरवणार

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2018 12:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...