कर्नाटक निवडणूक : दुपारी 3 वाजेपर्यंत 56 टक्के मतदान

कर्नाटकचे ५ कोटी ६० लाख मतदार आज कौल देणार आहेत. 222 जागांसाठी आज मतदान होतंय. सत्ताधारी सिद्धरामैयांना पुन्हा संधी मिळणार की येडियुरप्पांकडे सत्तेच्या चाव्या जाणार याचं उत्तर आज मतदारपेट्यांमध्ये बंद होईल.

Sonali Deshpande | Updated On: May 12, 2018 03:48 PM IST

कर्नाटक निवडणूक : दुपारी 3 वाजेपर्यंत 56 टक्के मतदान

बंगळुरू, 12 मे : कर्नाटकचे ५ कोटी ६० लाख मतदार आज कौल देणार आहेत. 222 जागांसाठी आज मतदान होतंय.सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी 3 वाजेपर्यंत  56 टक्के मतदान झालं आहे. भाजपचे येडियुरप्पा आणि सदानंद गौडांनी मतदानाचा हक्क बजावला. तसंच अनिल कुंबळेच्या कुटुंबानंही मतदान केलं.

सत्ताधारी सिद्धरामैयांना पुन्हा संधी मिळणार की येडियुरप्पांकडे सत्तेच्या चाव्या जाणार याचं उत्तर आज मतदारपेट्यांमध्ये बंद होईल. भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही मोठ्या पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

गेल्या चार वर्षांमध्ये सातत्यानं पराभवांना सामोरं जात असलेल्या कॉंग्रेस पक्षाकडे सध्या कर्नाटक हे एकमेव मोठे राज्य आहे. पण भाजपनंही आणखी एका राज्यात पाय रोवण्यासाठी जोरदार मेहनत घेतली आहे. १५ मे रोजी कर्नाटकचं आगामी सरकार कोणाचं याचं उत्तर मिळू शकेल.

दरम्यान, बोगस निवडणूक ओळखपत्र सापडल्यामुळे वादग्रस्त ठरलेली आर.आर. नगर विधानसभेची पोटनिवडणूक तूर्तास रद्द करण्याचा निर्णय निवडणुक आयोगाने जाहीर केला आहे. इथे आता २८ मे रोजी मतदान तर ३१ मे रोजी इथे मतमोजणी करण्यात येईल असं निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 12, 2018 09:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close