बंगळूरू,ता.15 मे: कर्नाटकमध्ये कुणालाच बहुमत नाही हे स्पष्ट होताच बंगळूरमध्ये जोरदार हालचालींना सुरवात झालीय. काँग्रेसनं जेडीएसला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसनं जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
कुमारस्वामी हे आजच राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्याचीही शक्यता आहे. काँग्रेस, जेडीएस आणि बसपा मिळून 116 होत असल्यानं आता सर्व लक्ष राजभवनाकडे लागले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि अशोक गेहलोत काल रात्रीपासूनच बंगळूरमध्ये तळ ठोकून आहेत.
गोव्यात झालेली चूक पुन्हा करायची नाही याचं नियोजन काँग्रेसनं केलंय. तर भाजप सावध हालचाली करत असून त्यांचं सगळं लक्ष अपक्ष आमदारांवर लागलं आहे.
कर्नाटक चुनावः कांग्रेस नें जेडी (एस) को समर्थन दिया#KarnatkaVerdict pic.twitter.com/Piu9DktK3b
— दूरदर्शन न्यूज़ (@DDNewsHindi) May 15, 2018
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Election, Karnataka, Narendra modi, कर्नाटक, नरेंद्र मोदी, भाजप, येडियुरप्पा, राहुल गांधी, विधानसभा