S M L

येडियुरप्पांच्या शपथविधीवरून सुप्रीम कोर्टात मध्यरात्री रंगला हायहोल्टेज ड्रामा, असा होता घटनाक्रम

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण मिळाल्यामुळे काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला. काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि रात्रीच यावर निर्णय द्यावा अशी मागणी करण्यात आली.

Renuka Dhaybar | Updated On: May 17, 2018 07:31 AM IST

येडियुरप्पांच्या शपथविधीवरून सुप्रीम कोर्टात मध्यरात्री रंगला हायहोल्टेज ड्रामा, असा होता घटनाक्रम

मुंबई, 17 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण मिळाल्यामुळे काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला. काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि रात्रीच यावर निर्णय द्यावा अशी मागणी करण्यात आली. रात्रभराच्या गोंधळानंतर अखेर या दोन्ही पक्षांमधला युक्तीवाद पूर्ण झाला आहे.

काँग्रेसने राज्यपालांवर भाजपचा दबाव आहे अशी टीका करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. चीफ जस्टिस आॅफ इंडिया (CJI) यांच्या जेडीएस आणि काँग्रेसने दाद मागितली. दीपक मिश्रा यांनी रात्रीच यावर सुनावणी घ्यावी अशी विनंती काँग्रेसने केली होती. दीपक मिश्रा यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे नेते जमा झाले आहे. त्यामुळे रात्रभर यावर युक्तीवाद सर्वोच्च न्यायालयात सुरू होता.

कोर्टात नेमकं काय घडलं त्याकडे एक नजर टाकूयात...- रात्री 10.30 वाजता काँग्रेस-जेडीएसनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत येडियुरप्पा यांचा शपथविधी रोखण्याची मागणी केली.

- रात्री 11 वाजता अभिषेक मनु संघवी यांनी रजिस्ट्रारकडे रात्री सुनावणी घ्यावी असा अर्ज दाखल केला.

- मध्यरात्री 12.30 वाजता रजिस्ट्रार मुख्य न्यायाधीश यांच्या निवासस्थानी पोहचले.

Loading...
Loading...

- मध्यरात्री 1.45 वाजता कोर्ट नंबर 6मध्ये जस्टिस सीकरी यांच्या समोर सुनावणी सुरू झाली.

- संघवी यांनी तब्बल 2 तास आपलं अर्ग्युमेंट केलं. यावेळी इतिहासातील घटनांचे दाखले दिले.

- पहाटे 4 वाजता सॉलिसिटर मुकुल रोहोतगी यांचा भाजप आमदारांच्या वतीनं जबरदस्त युक्तिवाद.

- पहाटे 4.30 वाजता सुप्रीम कोर्टानं येडियुरप्पांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास नकार दिला.

- पहाटे 5.30 वाजता कार्टानं सुनावणीसाठी शुक्रवारची तारीख दिली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 17, 2018 07:30 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close