काँग्रेसची धुळधाण, प्रियांका गांधींची पुन्हा मागणी

काँग्रेसची धुळधाण, प्रियांका गांधींची पुन्हा मागणी

या पराभवानंतर पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

  • Share this:

कर्नाटक, 15 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सुरू केलेलं काँग्रेसमुक्त भारत अभियानाकडे आणखी एक पाऊल पुढे टाकलंय. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता राखलीये. भाजपच्या विजयामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना मोठा धक्का मानला जातोय. काँग्रेसच्या गोटात पुन्हा एकदा प्रियांका गांधी यांची मागणी होत आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झालाय. काँग्रेसच्या कार्यालयात शुकशुकाट पसरलाय. काँग्रेसचा कोणताही नेता प्रसारमाध्यमांशी बोलण्यासाठी जागेवर हजर नाही. या पराभवानंतर पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेसच्या गोटात पुन्हा प्रियांका गांधी यांच्या नावाची चर्चा सुरू झालीये. काँग्रेसचे नेते जगदीश शर्मा यांनी राहुल गांधी यांना प्रियांका गांधी यांच्यासोबत काम करायला हवे. जर असं झालं तर काँग्रेसला विजय मिळू शकतो अशी कबुलीच शर्मांनी दिली. राहुल गांधी मेहनत करताय. त्यांना पंतप्रधान सुद्धा व्हायचंय. पण दोघांनी मिळून काम केले तर त्याचा फायदा काँग्रेसला होईल अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

भाजपमध्ये उत्साह

कर्नाटक विधानसभा जिंकल्यानंतर भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं जातंय. कर्नाटकमधील विजय ऐतिहासिक आहे. आता 2019मध्येही कमळचं उमलणार हे निश्चित आहे अशी प्रतिक्रिया छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंह यांनी दिली.

First Published: May 15, 2018 12:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading