कर्नाटकात कोण करणार सत्ता स्थापन ? राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष

कर्नाटकात कोण करणार सत्ता स्थापन ? राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष

दरम्यान काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केलाय. तर येडियुरप्पा यांनी देखील राज्यपालांची भेट घेऊन भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा केलाय. आता राज्यपालांच्या भूमिकेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय.

  • Share this:

मुंबई, 16 मे : कर्नाटकची राजधानी बेंगलोरमध्ये आजचा दिवसही राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा असणार आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या आज वेगवेगळ्या बैठका होत असून थोड्याच वेळात काँग्रेसची बैठक सुरू होणार आहे. बंगलोरमधल्या काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेर काँग्रेसचे अनेक आमदार सध्या दाखल झाले असून थोड्याच वेळात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद , यांच्यासह इतर नेते दाखल होणार आहेत.

या बैठकीकडे संपूर्ण कर्नाटक राज्याचे लक्ष लागले असून बैठकीत काय काय घडामोडी घडणार याची उत्सुकताही राजकीय वर्तुळात आहे तर दुसरीकडे भाजपच्या कार्यालयातही 11 वाजता बैठक होणार आहे. त्यामुळे कर्नाटका कोणाची सत्ता असेल यावर सगळ्यांचं लक्ष आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. असं असलं तरी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएस यांनी हातमिळवणी केली आहे. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरसह काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा दिलाय. तर दुसरीकडे सत्ता स्थापनेसाठी भाजपनं देखील जेडीएसच्या मनधरणीचा प्रयत्न करून पाहिलाय.

दरम्यान काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केलाय. तर येडियुरप्पा यांनी देखील राज्यपालांची भेट घेऊन भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा केलाय. आता राज्यपालांच्या भूमिकेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय.

कर्नाटकमध्ये आता कोण सत्तास्थापन करू शकतं, याच्या शक्यतांचा आढावा घेऊयात.

शक्यता क्र. 1

- सगळ्यात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपाल निमंत्रण पाठवू शकतात.

- संख्याबळ आहे, येडियुरप्पांचा दावा

- शक्यता कमी

शक्यता क्र. 2

- भाजप-जेडीएस युती, कुमारस्वामी मुख्यमंत्री

- शक्यता फारच कमी

शक्यता क्र. 3

- काँग्रेस-जेडीएस युती, कुमारस्वामी मुख्यमंत्री

- सर्वात जास्त शक्यता

शक्यता क्र. 4

- भाजप सरकार बनवणार, काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा

- जेडीएस सत्तेबाहेर

- जवळपास अशक्यच

शक्यता क्र. 5

- काँग्रेस सरकार स्थापन करणार, भाजपचा बाहेरून पाठिंबा

- जेडीएस सत्तेबाहेर

- जवळपास अशक्यच

काँग्रेसची ऑफर जेडीएसनं स्वीकारल्यानं कर्नाटकात सत्तेचं समीकरण कसं असणार आहे त्यावर एक नजर टाकुयात

काँग्रेस जेडीएस अपक्ष इतर एकूण

78 38 1 1 = 117

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2018 09:18 AM IST

ताज्या बातम्या