कर्नाटकात सापडली 9746 बनावट मतदार ओळखपत्रं, भाजप, काँग्रेसचे आरोप-प्रत्यारोप

ज्या फ्लॅटमधून ही ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत, तो फ्लॅट मंजुळा नांजामुरी यांच्या नावे असून, त्या भाजपाच्या नेत्या असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 9, 2018 07:39 AM IST

कर्नाटकात सापडली 9746 बनावट मतदार ओळखपत्रं, भाजप, काँग्रेसचे आरोप-प्रत्यारोप

09 मे : तोंडावर येऊन ठेपलेल्या कर्नाटक निवडणुकांच्या आखाड्यात प्रचारांचा आणि आरोपप्रत्यारोपांचा जोर आहे. याच दरम्यान

काल रात्री कर्नाटकमध्ये एका फ्लॅटमधून 9 हजार 746 बनावट मतदार ओळखपत्रे सापडली आहेत. हा प्रकार गंभीर असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

ही ओळखपत्रे बनवण्यामागे आर. आर. नगर मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार मुनीरत्ना नायडू यांचा हात असल्याचा आरोप भाजपा नेते सदानंद गौडा यांनी केला आहे. तर या प्रकरणावरून भाजपा नाटक करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.

ज्या फ्लॅटमधून ही ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत, तो फ्लॅट मंजुळा नांजामुरी यांच्या नावे असून, त्या भाजपाच्या नेत्या असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मात्र भाजपाने तातडीने हा आरोप फेटाळून मंजुळा नांजमुरी यांनी सहा वर्षांपूर्वीच भाजपा सोडल्याचा दावा प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2018 07:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...