S M L

येडियुरप्पांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला मोदी आणि अमित शहा गैरहजर

येडियुरप्पा गुरुवारी सकाळी 9.30 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. पण दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.

Renuka Dhaybar | Updated On: May 17, 2018 12:05 PM IST

येडियुरप्पांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला मोदी आणि अमित शहा गैरहजर

मुंबई, 17 मे : कर्नाटकात आता कोणाचं सरकार स्थापन येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, अखेर त्यावर निर्णय घेण्यात आला आहे. राज्यपाल वाजूभाई वाला यांनी राज्यातील सर्वात मोठा पक्ष भाजप सरकारमध्ये सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केला आहे. दरम्यान येडियुरप्पा यांचा शपथविधी रोखण्यास सुप्रीम कोर्टानेही नकार दिल्याने मुख्यमंत्रीपदाचा मार्ग भाजपसाठी मोकळा झाला आहे.

त्यामुळे येडियुरप्पा गुरुवारी सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.

कर्नाटकात कोण सत्ता स्थापन करणार या मुद्द्यावर चांगलंच राजकारण पेटलं. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला पण असं असलं तरी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएस यांनी हातमिळवणी केली. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरसह काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा दिला. तर दुसरीकडे सत्ता स्थापनेसाठी भाजपनं देखील जेडीएसच्या मनधरणीचा प्रयत्न करून केला होता.त्यानंतर काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. तर येडियुरप्पा यांनी देखील राज्यपालांची भेट घेऊन भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा केला. पण यावर राज्यपालांनी सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वात आधी भाजपला आमंत्रण दिलं. याविरोधात काँग्रेस आणि जेडीएसने प्लान बी तयार करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पण तिथेही त्यांच्या पदरी नाराजी आली. कारण येडियुरप्पा यांचा शपथविधी रोखण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. त्यामुळे आता येडियुरप्पा यांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला.

त्यामुळे चुरशीच्या अशा या निवडणुकीमध्ये अखेर भाजपने बाजी मारली असं म्हणायला हरकत नाही. पण भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या येडियुरप्पा यांच्या शपथविधीदरम्यान, नरेंद्र मोदी आणि अमित शहा गैरहजर होते.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 17, 2018 08:15 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close