S M L

कर्नाटकचा 'मत'संग्राम : येडीयुरप्पा प्रचारात पडले कमी, पंतप्रधान मोदी उतरणार मैदानात?

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच प्रचाराची धुरा आपल्या हातात घ्यावी अशी चर्चा सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Sachin Salve | Updated On: Apr 10, 2018 11:19 PM IST

कर्नाटकचा 'मत'संग्राम : येडीयुरप्पा प्रचारात पडले कमी, पंतप्रधान मोदी उतरणार मैदानात?

कर्नाटक, 10 एप्रिल : कर्नाटकात भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बी एस येडीयुरप्पा यांच्या प्रभावहीन प्रचारामुळे दिल्लीतील पक्ष नेतृत्व नाराज असून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच प्रचाराची धुरा आपल्या हातात घ्यावी अशी चर्चा सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे.

गेल्या ४ महिन्यांपासून काँग्रेस पक्ष प्रभावीपणे आपला प्रचार करत आहे आणि त्या मानानं भाजपचा प्रचार कमी प्रभावी होत असल्याची चर्चा सध्या कर्नाटकात सुरू आहे. त्यामुळे भाजप प्रचाराचा हुकुमी एक्का असलेले नरेंद्र मोदी यांनी जोरदारपणे प्रचार करावा असा भाजपात चर्चेचा सूर असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ३० जिल्ह्यांपैकी २८ जिल्ह्यांचा दौरा पूर्ण केला आहे. त्यांच्या सभांना होत असणारी गर्दी पाहून भाजपच्या गोटात चिंता व्यक्त होत असल्याचं समजतंय.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे तर सातत्यानं नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांना टार्गेट करतायत. मोदी यांनी गेल्या ४ महिन्यात कर्नाटकात ४ सभा घेतल्या आहेत तर शहा यांनी जवळपास १२ जिल्ह्यांचा दौरा केला आहे. येत्या महिनाभरात नरेंद्र मोदी ८ ते १० सभा घेतील अशी शक्यता आहे. मात्र या सभांची संख्या वाढवून राज्यात मोदी लाट तयार करावी अशी राज्यातील भाजप नेत्यांची इच्छा आहे.

मोदींनी किमान १५ तरी सभा घ्याव्यात अशी कर्नाटकातील नेत्यांची इच्छा असल्याचं समजतंय. बी एस येडीयुरप्पा यांच्या सभांना आणि प्रचाराला फारसा प्रतिसाद मिळत नसल्यानं मोदींनीच प्रचाराचा धुरळा उडवावा असं भाजप नेत्यांवर वाटतंय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील कर्नाटकात येऊन प्रचार करणार असल्याचं समजतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 10, 2018 11:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close