कर्नाटकात 'रात्रीस खेळ चाले'; येडियुरप्पा सभागृहातच झोपले!

कर्नाटकातील राजकीय नाट्यावर काल (गुरुवारी) कोणताही निर्णय न झाल्याने आज मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांना कोणत्याही परिस्थितीत बहूमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2019 10:09 AM IST

कर्नाटकात 'रात्रीस खेळ चाले'; येडियुरप्पा सभागृहातच झोपले!

बेंगळुरू, 19 जुलै: कर्नाटकातील राजकीय नाट्यावर काल (गुरुवारी) कोणताही निर्णय न झाल्याने आज मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांना कोणत्याही परिस्थितीत बहूमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. राज्यपाल वाजुभाई वाला यांनी कुमारस्वामी यांना दुपारी दीड वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. राज्यपालांनी यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्र्यांना लिहले आहे. त्यामुळे कर्नाटकातील नाट्याचा हा अखेरचा दिवस ठरण्याची शक्यता आहे.

कर्नाटकात काल विधासनभेत विश्वासदर्शक ठरावावर चर्चा सुरु असताना आमदारांनी गदारोळ केल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते. गुरुवारी कामकाज सुरु झाल्यानंतर सभागृहात 20 आमदार पोहोचले नव्हते. यात सत्तधारी काँग्रेस-जेडीएसचे 17 आमदार होते. याशिवाय 12 बंडखोर आमदार मुंबईतच आहेत. विशेष म्हणजे कालच्या गोंधळानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार सभागृहातच झोपले होते. इतक नव्हे तर मुख्यमंत्री देखील रात्री दीड वाजेपर्यंत सभागृहात होते. दरम्यान भाजपचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पा यांनी सरकारकडे बहुमत नसल्याचा दावा केला आहे. राजीनामा देणारे काँग्रेसचे आमदार रामालिंग रेड्डी यांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला आहे. बहुमत चाचणी दरम्यान ते कुमारस्वामींच्या बाजूने मत करणार आहेत.

कर्नाटक पोलीस मुंबईत दाखल

कर्नाटकमधील बंडखोर आमदार वगळता आणखी एक आमदार काल विधानसभेत न पोहोचल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर चौकशी केली असता ते मुंबईतील रुग्णालयात असल्याचे समजले. श्रीमंत पाटील उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्या प्रकृती संदर्भात देखील सभागृहात चर्चा झाली होती. सिद्धरामय्या यांनी पाटील यांचे अपहरण झाल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर पाटील यांची चौकशी करण्यासाठी कर्नाटक पोलीस मुंबईत दाखल झाले आहेत.

राज्यातील सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. विधानसभा अध्यक्षांनी अद्याप बंडखोर आमदारांच्या संदर्भात निर्णय घेतलेला नाही. आमदारांच्या राजीनाम्यासंदर्भात कोर्टने दिलेल्या आदेशामुळे आधीच कुमारस्वामी यांना झटका बसला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या

SPECIAL REPORT: 'या' क्वाड्रासायकलमधून तुम्ही प्रवास केलात का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 09:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...