दलित असल्यामुळेच मुख्यमंत्रीपद नाकारलं, काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांचा आरोप

दलित असल्यामुळेच मुख्यमंत्रीपद नाकारलं, काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांचा आरोप

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी परमेश्वर यांच्या आरोपामुळे कर्नाटकमध्ये राजकीय वादळ निर्माण झालंय. तर काँग्रेसपक्ष अडचणीत आलाय.

  • Share this:

बंगळूरू 25 फेब्रुवारी : कर्नाटकमध्ये काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिला आणि कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले. भाजप सत्तास्थापनेपासून दूर राहिला मात्र यामुळे काँग्रेसमधला अंतर्गत वाद धुमसत आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी परमेश्वर यांच्या आरोपामुळे कर्नाटकमध्ये राजकीय वादळ निर्माण झालंय. तर काँग्रेसपक्ष अडचणीत आलाय.

लोकसभा निवडणुका जवळ आल्याने राजकीय पक्ष ताकही फुंकून पीत आहेत. अशा पार्श्वभूमीवर पक्षातल्याच एका दिग्गज दलित नेत्याने केलेल्या आरोपांमुळे काँग्रेस अडचणीत आलाय. दावणगिरीत एका कार्यक्रमात बोलताना परमेश्वर यांनी हा आरोप केला. ते म्हणाले, " तीन वेळा मला मुख्यमंत्रीपदाची संधी आली होती.

मात्र केवळ दलित असल्यामुळे मला ती संधी देण्यात आली नाही. काँग्रेस पक्षात काही लोक दलितांना वर जावू देत नाहीत." परमेश्वर यांच्या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी हात झटकले आहेत. असं केव्हा झालं असेल असं मला माहित नाही. त्याबद्दल तुम्ही त्यांनाच विचारा असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.

बसवलिंगप्पा, केएच रंगनाथ, मल्लिकार्जुन खर्गे यांनाही मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली नाही. काही लोक माझं खच्चीकरण  करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही त्यांनी केलाय.

फक्त राजकीय स्तरावरच नाही तर नोकऱ्यांमध्येही पदोन्नतीसाठी दलितांवर अन्याय होतो. आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे मात्र पण त्याचा फारसा फरक पडलेला नाही. नोकरीत भेदभाव झाल्यामुळे काही अधिकाऱ्यांनी आत्महत्याही केल्या आहेत.

परमेश्वर हे कायम आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. कुमारस्वामी हे पूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील की नाही याची काहीही शाश्वती नाही असं मत त्यांनी या आधी व्यक्त केलं होतं. त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसमध्ये वादही निर्माण झाला होता.

First published: February 25, 2019, 3:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading