प्रेमासाठी मुलीने वडिलांच्या गळ्यावर 10 वेळा फिरवला चाकू, बाथरूममध्ये जाळला मृतदेह!

प्रेमासाठी मुलीने वडिलांच्या गळ्यावर 10 वेळा फिरवला चाकू, बाथरूममध्ये जाळला मृतदेह!

हा खुनी खेळ वडिलांची हत्या करून थांबलं नाही. तर त्यांनी 41 वर्षांच्या जय कुमार यांचा मृतदेह बाथरुममध्ये नेला आणि पेटवून दिला.

  • Share this:

कर्नाटक, 20 ऑगस्ट : प्रेम प्रकरणातून गुन्हा होण्याचं प्रमाण सध्या वाढलं आहे. प्रेमात बुडालेल्या अल्पवयीन मुलीने वडिलांचाच जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलीने वडिलांची हत्या केल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कर्नाटकची राजधानी बंगळूरुमध्ये हा नात्यांचा खुनी खेळ रंगला आहे.

सोमवारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगी ही 15 वर्षांची होती. प्रवीण या 18 वर्षाच्या मुलासोबत तिचं प्रेम प्रकरण होतं. प्रवीणच्या प्रेमामध्ये मुलगी पूर्ण बुडाली होती. वडिल जय कुमार जैन यांच्या हत्येच्या आरोपाखाली दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर रविवारी सकाळी मुलीने वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त वी. धनंजय कुमार यांनी सांगितले की, जय कुमार हे राजस्थानला राहणारे होते. बंगळूरुच्या रजनीनगरमध्ये त्यांचं कपड्यांचं दुकान होतं. त्यामुळे प्रवीण आणि आरोपी मुलीमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं. त्ंयांच्या प्रेमाआड येणाऱ्या पित्याला लेकीने तिच्या प्रियकरासोबत कट रचून मारलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

लेकीनं वडिलांनी दिली होती नशेचं औषध

आई-बाबा एका लग्न समारंभातून परत आल्यानंतर मुलीने त्यांना दुधामधून नशेचं औषध दिलं. त्यानंतर जय कुमार यांची शुद्ध हरपली आणि ते झोपले. याचाच फायदा घेत मुलीने प्रियकराला बोलावलं आणि त्याच्या मदतीने वडिलांचा गळा चिरून हत्या केली.

खरंतर हा खुनी खेळ वडिलांची हत्या करून थांबलं नाही. तर त्यांनी 41 वर्षांच्या जय कुमार यांचा मृतदेह बाथरुममध्ये नेला आणि पेटवून दिला. जेव्हा संपूर्ण परिसरात धूर झाला तेव्हा पोलीस आणि अग्रिशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि संपूर्ण प्रकाराचा छडा लागला.

इतर बातम्या - हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अशी जाहिरात करून पुरवल्या जायच्या महिला

...अखेर मिळाला अर्धवट जळालेला मृतदेह

आग लागल्याची माहिती मिळाताच पोलीस आणि अग्निशमनच्या गाड्यांनी आग विझवली. त्यानंतर घरात शिरताच जय कुमार यांचा अर्धा जळालेला मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. सगळ्यात धक्कादायक म्हणजे त्यांच्या शरीरावर चाकूने 10 वार केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी आरोपी मुलगी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलं. त्यांना पोलीसी छडी दाखवता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. प्रेम प्रकरणाला वडिलांचा विरोध असल्यामुळे रागात तिने हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं.

...तर मारलंच असतं, ठाणे महापौराच्या पदाधिकाऱ्याची मराठा कार्यकर्त्यांना धमकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 12:33 PM IST

ताज्या बातम्या