कर्नाटकात कुमारस्वामी सरकार कोसळणार? आज होणार बहुमत चाचणी!

कर्नाटकातील एच.डी.कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जनता दल सेक्युलर-काँग्रेस आघाडी सरकारची आज अग्निपरीक्षा आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2019 07:57 PM IST

कर्नाटकात कुमारस्वामी सरकार कोसळणार? आज होणार बहुमत चाचणी!

बेंगळुरू, 22 जुलै: कर्नाटकातील एच.डी.कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जनता दल सेक्युलर-काँग्रेस आघाडी सरकारची आज अग्निपरीक्षा आहे. कुमारस्वामी सरकारला आज कोणत्याही परिस्थितीत बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष के.आर.रमेश कुमार यांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी 6 पर्यंतची वेळ दिली आहे. यासाठीची सर्व तयारी झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जे 16 बंडखोर आमदार आहेत ते सभागृहात आले नाही तर त्यांना गैरहजर मानले जाईल.

कर्नाटक सरकारसाठी संकटमोचक मानले जाणारे मंत्री डी.के.शिवकुमार यांनी सरकार वाचवण्याचा अखेरचा प्रयत्न केला. त्यांनी बंडखोर आमदारांना सरकारच्या बाजूने वळवण्यासाठी कुमारस्वामी यांच्या ऐवजी अन्य कोणालाही मुख्यमंत्री करण्याची तयारी दाखवली. सरकार वाचवण्यासाठी जेडीएस मुख्यमंत्रीपदाचा त्याग करू शकते असे शिवकुमार यांनी सांगितले. इतक नव्हे तर कुमारस्वामी देखील काँग्रेसकडून कोणत्याही नेत्याला मुख्यमंत्री करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांशी बोलल्याचे त्यांनी सांगितले.

16 आमदारांनी दिला राजीनामा

राज्यातील सत्ताधारी पक्षातील 16 आमदारांनी बंडखोरी करत राजीनामा दिला होता. या 16 मध्ये 3 जण जेडीएसचे आहेत. त्याशिवाय आर.शंकर आणि एच.नागेश या दोन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. जेडीएस-काँग्रेस आघाडीकडे 117 आमदार आहेत. त्यापैकी 78 काँग्रेसचे, 37 जेडीएसचे, बसपाचा 1 आणि अध्यक्षांनी नियुक्त केलेला एक आमदार यांचा समावेश आहे. याउलट दोन अपक्ष उमेदवारांच्या पाठिंब्यांच्या जोरावर 225 सदस्यांच्या सभागृहात भाजपकडे 107 जणांचा पाठिंबा आहे. जर 16 बंडखोर आमदारांचे राजीनामे मंजूर झाले किंवा त्यांनी मतदानात भाग घेतला नाही तर कुमारस्वामी सरकारचे संख्याबळ 101 होईल आणि ते अल्पमतात येईल.

VIDEO : राज ठाकरेंकडून काय धडा घेतला? आदित्य ठाकरेंना विद्यार्थ्याचा थेट सवाल

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2019 07:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...