कर्नाटकी नाट्याचा आज शेवटचा अंक? कुमारस्वामी सरकारची अग्निपरीक्षा!

कर्नाटकातील जनता दल सेक्युलर(JDS) आणि काँग्रेसचे आघाडी सरकारचा आज फैसला होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2019 08:20 AM IST

कर्नाटकी नाट्याचा आज शेवटचा अंक? कुमारस्वामी सरकारची अग्निपरीक्षा!

बेंगळुरू, 18 जुलै: कर्नाटकातील जनता दल सेक्युलर(JDS) आणि काँग्रेसचे आघाडी सरकारचा आज फैसला होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींचा आज शेवटचा अंक असेल. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या सरकारला आज विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या गटातील 15 आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सरकार अस्थिर झाले आहे. अशातच काल (बुधवारी) सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदार बहुमत चाचणी दरम्यान विधासभेत सहभागी होणार नाहीत, असे स्पष्ट केले होते.

राज्यातील सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 15 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

बंडखोर आमदार काय म्हणतात

जेडीएस आणि काँग्रेसच्या ज्या 15 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यांना काल सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. आज बहूमत चाचणीसाठी त्यांना विधानसभेत उपस्थित राहण्याची गरज नाही. बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर या आमदारांनी कोणत्याही परिस्थितीत निर्णय बदलणार नसल्याचे म्हटले आहे.

Loading...

अशी आहे विधानसभेतील परिस्थिती

सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या आदेशानंतर 224 सदस्य संख्या असलेल्या विधानसभेचे संख्याबळ 208वर आले आहे. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी 105 आमदारांची गरज असेल आणि कुमारस्वामी सरकारकडे 101 आमदार आहेत. सभागृहात काँग्रेसचे संख्याबळ 79 वरून 66 झाले आहे. तर जेडीएसचे संख्याबळ 37वरून 34वर पोहोचले आहे. बंडखोर आमदारांचा थेट फायदा भाजपला होऊ शकतो. त्यांच्याकडे 105 आमदार आहेत. याशिवाय दोन अपक्ष आमदार एच नागेश आणि आर शंकर देखील भाजप सोबत आहेत.

कारमध्ये एलपीजी गॅसचा स्फोट; दुर्घटनेची भीषणता दाखवणारा VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 08:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...